सासऱ्याची विधवा सुनेला लग्नासाठी जबरदस्ती

नकार देताच मुंडन करून काढली धिंड
सुनेने विरोध करताच केले असे कृत्य
मुजफ्फरनगर /नवप्रहार मीडिया
सून आणि सासऱ्याचे नाते हे वडील आणि मुलीसारखं असतं. पण काही लोकं महिलांना फक्त उपभोगाची वस्तू समजून त्यांना सोबत चुकीचे व्यवहार करतात. असाच प्रकार मुजफ्फर नगर जिल्ह्यात घडला आहे, येथे ऐका सासऱ्याने सूनेसोबत जबरदस्तीने लग्न करण्याच्या प्रयत्न केला. सुनेने नकार देताच केले भयानक कृत्य.
मुझफ्फरपूरमधील कार्जा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. पीडीत महिलेने सासऱ्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पतीच्या मृत्यूनंतर पीडित महिला ही एकटीच घरी राहत होती. चुलत सासऱ्याची तिच्यावर वाईट नजर होती. 20 ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला आहे. सासरा जबरदस्ती तिच्या घरी घुसला. तिच्याशी असभ्य भाषेत बोलू लागला. यानंतर तिच्या कपाळाला कुंकू लावत त्याने तिच्याशी जबरदस्ती विवाह करण्याचा प्रयत्न केला.
जबरस्ती बेकायदेशीरपणे विवाह करण्याचा प्रयत्न करणाऱया सासऱ्याला सुनेने विरोध केला. नराधम सासऱ्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने सुनेचे जबरदस्ती मुंडन केले आणि गावभर तिची धिंड काढली. यावेळी सुनेला वाचवण्यासाठी मदतीला आलेल्या सासुला देखील या नराधमाने मारहाण केली.
पीडित महिलेच्या तक्रारानंतर पोलिसांनी सासऱ्यासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. देवेंद्र मांझी, गुला मांझी, जय राम मांझी, शंभू मांझी, सोनू मांझी, जयलाल मांझी, अखिलेश मांझी आणि मिथलेश मांझी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व पीडित महिलेचे नातेवाईक आहेत. या सर्वांनी आरोपीला महिलेविरोधात वाईट कृत्य करण्यास मदत केली.
पीडित महिलेने 8 जणांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.