हटके

स्टाफ क्वार्टर मध्ये घुसले बिबट्याचे कुटुंब 

Spread the love

खमीरिया / नवप्रहार मीडिया

                शहराचा वाढता व्याप आणि त्यासाठी कमी होणारी जंगले यामुळे वन्य प्राण्यांचे त्यांचा अधिवास सोडून गावात आणि शहरात येण्याचे प्रमाण वाढले आहे. गावात वन्य प्राणी पाळीव प्राण्यांची शिकार करण्यासाठी शिरतात. पण मागील काही काळापासून शहरात देखील त्यांचा संचार पाहायला मिळत आहे.

नुकताच एक नव्हे तर चार बिबट रहिवाशी क्षेत्रात घुसल्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापैकी एक बिबट गेटवरून उडी मारून पळून गेले तर तीन त्याच ठिकाणी होते. त्यामुळे हे स्टाफ राहत असलेल्या क्वार्टर मध्ये राहायला आले होते की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

हा व्हिडीओ एक्स (पूर्वीचे ट्विटर)च्या हॅण्डल @aniltalwar2 वर शेअर करण्यात आला आहे. त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘१० वाजता खमिरिया, जबलपूरच्या स्टाफ क्वार्टरमध्ये.’ ही घटना जबलपूरमधील आहे. व्हिडीओमध्ये चार बिबट्या गेटजवळ फिरताना दिसत आहेत. कॅमेऱ्याने रेकॉर्डिंग करणाऱ्या व्यक्तीला बिबट्याने पाहिले आणि लगेचच गेटमधून उडी मारून पळ काढला; मात्र उर्वरित तीन बिबटे तिथेच फिरत असल्याचे दिसते.

काही वेळाने आणखी दोन बिबट्या एकामागून एक गेटच्या बाहेर उड्या मारतात; पण एक बिबट्या गेटच्या वर बसला आहे. तो थोडा वेळ तिथेच राहतो आणि मग तोही तिथून उडी मारतो. हा व्हिडीओ आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

या व्हिडीओवर लोक जोरदार कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले आहे, ‘असे दिसते की, एंट्री करण्यापूर्वी त्यांचे आय-कार्ड तपासले गेले नाही.’ दुसऱ्या युजरने लिहिले, ‘व्वा! संपूर्ण बिबट्याचे कुटुंबच येथे आहे.’ तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे, ‘ही मोफत सफारीची बाब आहे.’ हा व्हिडीओ जबलपूरचा नसून, महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या सेक्टर ६ चा असल्याचा दावा काही युजर्सनी केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close