क्राइम

उपचारासाठी आलेल्या महिलेवर डॉक्टरने केला वारंवार बलात्कार 

Spread the love

अडीच तोळ्याचा राणीहार देखील हिसकावला 

पाटस /नवप्रहार डेस्क 

                 डॉक्टरांना जमिनीवरील देव म्हटल्या जाते. त्यामुळे कोणीही त्यांच्यावर सहज विश्वास करतो। या विश्वासामुळेच अनेक लोकं घरातील महिला मंडळीला एकटे डॉक्टर कडे पाठवतात. उपचारासाठी आलेल्या महिलेवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याची घटना वरवंड येथील घडली आहे.  पाटस पोलीसांनी वरवंड येथील डॉक्टरला अटक केली आहे. ही माहिती पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी दिली.

डॉ. सुनिल नामदेव झेंडे ( मुळ रा. दिवे ता. पुरंदर जि. पुणे, सध्या रा. वरवंड ता. दौंड जि.पुणे ) असे या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की. वरवंड येथील धन्वंतरी अँक्युप्रेशर सेंटर आयुर्वेदिक दवाखान्याचा डॉक्टर सुनील झेंडे याच्या रुग्णालयामध्ये 21 ऑगस्ट 2024 रोजी पीडित महिला ही पाठीवर गाठ आल्याने उपचारासाठी दवाखान्यात गेली होती.

यावेळी आरोपी डॉक्टरने पीडित महिलेला ओढून घेऊन मिठी मारली. त्यावेळी तिने त्यांना डॉक्टर तुम्ही असे काय करता? मी माझे घरातील लोकांना सांगेल, असे म्हणाली असता, मला तु मला आवडतेस आपण दोघे बाहेर फिरायला जावु असे म्हणाल्याने तिने त्यास नकार दिला. मात्र आरोपीने बळजबरीने धरून दवाखान्याच्या आतील खोलीत घेऊन अत्याचार केले. याबाबत कोणाला सांगु नकोस नाहीतर मी तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली.

त्यानंतर आरोपी डॉक्टरने 21 ऑगस्ट 2024 ते 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केले. पिडीतेने भितीपोटी अडीच तोळ्याचा सोन्याचा राणीहार घरात कोणास काहीएक न सांगता त्याला दिला. त्यानंतर दहा दिवसानंतर माझा सोन्याचा राणीहार मला परत दया असे पिडीतेने सांगितले, पण सोन्याचा राणीहार डॉक्टरने दिला नाही. उलट वारंवार तुला तुझा राणीहार पाहीजे असेल, तर तु माझे सोबत शाररीक संबंध ठेव. नाहीतर मी तुझे घरात सांगेल अशी सारखी धमकी देत पिडीत महिलेचा अडीच तोळ्याचा सोन्याचा राणीहार बळकावला असे फिर्यादीत नमूद केले आहे.

ही फिर्याद पीडित महिलेने पाटस पोलीस चौकीत दिल्याने मंगळवारी (दि. 10) संबंधित डॉक्टरवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित डॉक्टरला पाटस पोलिसांनी अटक केली असून बुधवारी (दि.11) दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची म्हणजे 16 डिसेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close