ब्रेकिंग न्यूज

ईडीचा अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Spread the love
१५ लाख घेतांना रंगेहाथ अटक
राजस्थान / नवप्रहार मीडिया 
                   राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना एसिबी ने केलेल्या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रासह अधिकारी वर्गात खळबळ माजली आहे. लाच लुचपत
राजस्थान एसीबीनं लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे.
 नवल किशोर मीना आणि त्याचा सहकारी बाबुलाल मीना  असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.  तक्रारकर्त्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. तक्रारकर्त्याच्या दाव्यानुसार ईडीच्या अधिकाऱ्यानं त्यांच्याकडे १७ लाखांच्या लाचेची मागणी केली होती. चिट फंड प्रकरणात अटकेची कारवाई न करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.
राजस्थान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त संचालक हेमंत प्रियदर्शी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. ते म्हणाले की, तक्रारदारानं एसीबीच्या जयपूर नगर तीन यूनिटकडे ईडी कार्यालय इम्फाळ मणिपूरच्या अधिकाऱ्याच्या नावे तक्रार दिली होती. चिट फंड प्रकरणात संपत्ती जप्त न करण्यासाठी आणि अटकेची कारवाई टाळण्यासाठी नवल किशोर मीना यांनी तडजोडीसाठी लाचेची मागणी केल्या प्रकरणी एसीबीकडे तक्रार प्राप्त झाली होती. अंमलबजावणी संचलनालय, इम्फाळ, मणिपूरच्या उपविभागीय कार्यालायतील अधिकारी नवल किशोरी मीना यांनी १७ लाखांची लाच मागितली होती. एसीबीनं या तक्रारीची शाहनिशा केली आणि त्यानंतर अधिकाऱ्याला आणि त्याच्या सहकाऱ्याला पकडण्यासाठी जाळं लावलं होतं. १५ लाख रुपयांची लाच घेताना ईडीच्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली.

राजस्थान एसीबीकडून ईडीच्या अधिकाऱ्याची चौकशी केली जात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. राजस्थानातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या कारवाईनं सर्वत्र खळबळ उडाली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Close
Close