क्राइम

बँक व्यवस्थापक आणि सुवर्ण मूल्यमापक यांनी मिळून बँकेला लावला ७ कोटींचा चुना

Spread the love

सुवर्ण मूल्य मापकाने लाखोंचे खाजगी कर्ज फेडून ४४ लाखांचे दोन प्लॉट खरेदी केले

 बदनापूर (जि. जालना) / विशेष प्रतिनिधी

येथील कॅनरा बँकेतील सव्वासात कोटींच्या गोल्डन घोटाळ्यातील संशयित असलेल्या सुवर्ण मूल्यमापकाने १९ लाखांचे खाजगी कर्ज फेडून ४४ लाखांचे २ प्लॉट विकत घेतल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, न्यायालयाने दोन्ही संशयितांना २ दिवसांची कोठडी सुनावली.

येथील कॅनरा बँकेतील सव्वासात कोटींच्या घोटाळ्याचा तपास पोलिस निरीक्षक एम.टी. सुरवसे यांनी सुरू केला आहे. संशयित शाखा व्यवस्थापक विजेंद्र पाटणकर, सुवर्ण मूल्यमापक प्रवीण बुऱ्हाडे या दोघांच्या बदनापूर येथील घरांची पोलिसांनी झडती घेतली आहे. यात पाटणकर यांच्या घरात काही मिळालेले नाही. मात्र, सुवर्ण मूल्यमापक बुऱ्हाडे याच्या घरातून ४४ लाखांच्या २ प्लॉटची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. शिवाय, त्याने खाजगी लोकांचे १९ लाखांचे कर्ज या घोटाळ्याच्या पैशांतून फेडल्याची माहिती पोनि सुरवसे यांनी दिली.

कामासाठी बँकेतून गेलेला तिसरा संशयित परत आलाच नाही
कॅनरा बँकेत पहिल्या दिवशी तपासणी अर्धवट राहिल्यामुळे दुसऱ्या दिवशी २३ एप्रिल रोजी पुनर्मूल्यांकन पथक दुपारी सुमारे १२:०० वाजता पोहोचले. मात्र, संशयित बँक अधिकारी संजय आसाराम डोंगरे हा कामासाठी बाहेर चाललो, अर्ध्या तासात परत येतो, असे सांगून निघून गेला. त्यानंतर तो परतलाच नाही. त्याच्याशी संपर्कदेखील होत नाही. त्याच दिवशी या आरोपीने बँकेतील सोन्याची पाकिटे खिशात ठेवल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

पहिल्याच दिवशी सोन्याची पाकिटे आढळली
सुवर्णकर्ज पॅकेजचे पुनर्मूल्यांकन आणि पडताळणी दर ३ महिन्यांनी केली जाते. बदनापूरच्या कॅनरा बँकेत पुनर्मूल्यांकन प्रक्रिया २२ एप्रिल रोजी सुरू करण्यात आली. प्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक प्रदीप शिंदे आणि सुवर्ण मूल्यमापक सचिन के. मांड यांनी ९८ सुवर्ण कर्ज पाकिटांचे पुनर्मूल्यांकन केले. त्यापैकी दोन पाकिटांमध्ये बनावट सोने असल्याचे आढळले. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे त्यादिवशी सायंकाळी हे काम थांबविण्यात आले. २३ एप्रिल रोजी पुनर्मूल्यांकन सुरू झाले. त्यानंतर बनावट सोने आढळून आले. २४ एप्रिलला ताळमेळ प्रक्रियेत सोन्याच्या कर्जाची ३० पाकिटे गहाळ झाल्याचे समोर आले.

२० ते २५ जणांची टीम बनविल्याची चर्चा
गोल्डन घोटाळा बाहेर आल्यानंतर बनावट सोने तारण ठेवून ज्यांच्या नावावर कर्जाची रक्कम वर्ग करण्यात आली, अशा सुमारे २० ते २५ जणांची टीम कार्यरत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग केली जात होती. नंतर या बँक खात्यांमधून अवघ्या दोन- तीन मिनिटांतच ही रक्कम दुसऱ्या बँक खात्यांमध्ये वर्ग केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close