क्राइम

तमन्ना  ‘ ची वासनेची ‘तमन्ना ‘  तिला कारागृहात घेऊन गेली

Spread the love

शेखपूरा (हरियाणा ) / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

                       सध्या अनैतिक संबंध मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. अनैतिक संबंधाचा शेवट धक्कादायक असतो याची कल्पना असतांना देखील वासनेच्या आहारी गेलेले लोक समजून उमजून देखील या फंद्यात पडतात. अनैतिक संबंधातुन खुनाची घटना हरियाणातील शेखपूरा येथे घडली आहे. ‘तमन्ना ‘ च्या वासनेची ‘ तमन्ना ‘ तिला कारागृहात घेऊन गेली.

             आजम खान या 18 वर्षीय तरुणाचा मृतदेह तलावात सापडल्या नंतर पोलीस चौकशीला सुरवात झाली होती. आजम हा अत्यंत मनमिळावू असल्याने त्याची हत्या कोणी केली हा प्रश्न पोलिसांना तपासा दरम्यान सतावत होता.सगळ्या बाजूने चौकशी केल्यावर सुद्धा पोलिसांना तपासाची दिशा सापडत नव्हती.तेव्हा त्यांनी तपासाची दिशा आजम खान यांच्या कुटुंबावर केंद्रित केली. शेजाऱ्यांना विचारपूस करताना पोलिसांच्या हाती एक उपयुक्त माहिती लागली. पोलिसांनी त्या दिशेने तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली .

                   तमन्ना हिचे लग्न 6 वर्षांपूर्वी गफ्फार सोबत झाले होते. पण लग्नाच्या एक वर्षानंतर तिचे अनैतिक संबंध शेजारी राहणाऱ्या रोहित अजीबात जुळले. दोघांमध्ये अनेकदा अवैध संबंधही निर्माण झाले होते. तमन्ना ही आझम खानची वहिनी आहे आणि आझम खानचा भाऊ गफ्फार याचे लग्न 6 वर्षांपूर्वी तिच्याशी झाले होते. रोहितसोबत तमन्नाचे अफेअर लग्नाच्या 1 वर्षानंतरच सुरू झाले. दोघांमध्ये अवैध संबंध निर्माण होऊ लागले.

दोघांनीही एकदा गफ्फारला मारण्याचा कट रचला होता, त्यासाठी रोहितने विष आणले आणि ते तमन्नाला दिले, जेणेकरून ती आपल्या नवऱ्याला ते घालून त्याला मारु शकेल, ज्यानंतर तमन्ना आणि रोहितचा मार्ग मोगळा होईल, परंतू तसं घडलं नाही. त्यापूर्वीच बकरीदच्या काही दिवस आधी तमन्नाच्या घरी कोणी नसताना सर्वजण बाहेर गेले होते, मग तमन्नाने रोहितला घरी बोलावले आणि दोघांमध्ये अवैध संबंध निर्माण झाले, तेव्हा दीर आझम खान तेवढ्यात घरी आला आणि त्याने या दोघांनाही विचित्र अवस्थेत पाहिले.

आझम खानने कोणाला सांगू नये, म्हणून त्या दिवशी रोहितने स्वत:च्या हाताची नसही कापली जेणेकरून तो भावनिकरीत्या आझमला ब्लॅकमेल करू शकेल, पण त्यानंतर रोहित आणि तमन्ना मिळून आझम खानच्या हत्येचा कट रचतात. बकरीदला रोहित आझमला बाहेर बोलावतो आणि चाकूने त्याच्यावर वार करतो.

त्याला मारण्यापूर्वी त्याच्या शरीरावर अनेक वार केला जातात. त्यावेळी त्याच्या डोळ्यावरही चाकूने वार केले होते. आझम खानची हत्या केल्यानंतर रोहितने त्याचा मृतदेह तलावात फेकून दिला. त्यानंतर जेव्हा मृतदेह सापडला तेव्हा पोलीसांना या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला, ज्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. तमन्नाने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत पोलिस चौकशीत सांगितले की, तिचा पती गफ्फार लैंगिकदृष्ट्या कमकुवत (नपुंसक) असल्याने ती रोहितच्या जवळ आली. तमन्नाने सांगितले की, माझे हे मूल देखील रोहितचे आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी घेण्यात येणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close