सामाजिक

युवा एल्गार विद्यार्थी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण

Spread the love

अरविंद वानखेडे यवतमाळ वार्ता

यवतमाळ आझाद मैदान येथे दिनांक 20 9 2023 बुधवारपासून विविध घेऊन धनंजय वानखडे हे उपोषणाकरिता बसले आज उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांना पाठिंबा देण्याकरिता, भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी दीपक दादा कॉम्पलेवार हे सुद्धा आजपासून उपोषण मंडपात उपोषण करिता बसले
महाराष्ट्र शासनाने खाजगी नऊ कंपन्यांना दिलेल्या पदभरतीचा आदेश त्वरित रद्द करावा, कंत्राटी भरती बंद करून सरळ सेवा भरती करावी, महाराष्ट्रातील 62 हजार शाळांचे खाजगीकरण करण्याकरिता निघालेला आदेश परत घेऊन सुरू असलेली प्रक्रिया लवकर थांबवावी, समान काम समान वेतन याप्रमाणे ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स ग्रामपंचायत मधील डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना इतर शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन देण्यात यावे अशा विविध मागण्या घेऊन उपोषणकर्त्यांनी उपोषण सुरू केले आजचा पाचवा दिवस असून सुद्धा शासनाच्या कोणत्याही प्रकारचा अधिकारी उपोषण मंडपात भेट देण्यात आला नाही तर शहरातील मात्र अनेक संघटनांनी उपोषण मंडपाला भेट देऊन पाठिंबा जाहीर केला आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close