क्राइम

तरुणीला संपवून स्वतः ही केली आत्महत्या 

Spread the love

मुंबई / प्रतिनिधी

                     तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहाला दगड बांधून पाण्यात टाकले. त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामागे नेमके कारण काय ? याबद्दल अद्याप समजले नाही. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.नवी मुंबई पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे, मात्र मुलाचा शोध सुरू आहे.

मृत्यू झालेली मुलगी नवी मुंबईमधील तर मुलगा पनवेल तालुक्यातील असल्याची माहिती आहे. नवी मुंबई पोलीस घटनेचं कारण आणि दोघांची ओळख पटवण्याचं काम करत आहेत. ही घटना संध्याकाळी पाच ते सहा वाजता घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरण ताजं असतानाच आता नवी मुंबईमध्ये ही घटना घडल्यामुळे खळबळ माजली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close