राजकिय

UBT गटाला मोठा धक्का ; 50 – 60 कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे 

Spread the love

मुंबई / विशेष प्रतिनिधी

                  निवडणुकीच्या प्रचाराला आता कुठे रंग चढायला सुरुवात झाली आहे. नेत्यांच्या उमेदवारांच्या मतदार संघात सभा सुरू झाल्या आहेत. अश्यातच UBT गटाला मोठा धक्का बसला आहे. तब्बल ६० पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. मविआच्या जागावाटपात एरंडोलची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्यामुळे शिवसैनिक नाराज झाले होते.

एरंडोल मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटांनी लढवली नाही. त्यामुळे नाराज असलेल्या कार्यकर्ते जिल्हा परिषद सदस्यांसह 50 ते 60 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. अनेक वर्षांपासून शिवसेना लढवत असलेली जागा शिवसेने न लढवता महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेल्यामुळे नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिला.

जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, माजी सभापती तालुकाप्रमुख युवा सेना तालुकाप्रमुख यांच्यासह तब्बल पन्नास जणांनी राजीनामे दिले.

नानाभाऊ महाजन यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र माघार घेत त्यांनी कार्यकर्त्यांची चर्चा करत राजीनामे दिले आहेत. व्हॉट्सअपच्या माध्यमातून उद्धव ठाकरे तसेच संपर्कप्रमुख संजय सावंत यांना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजीनामे पाठवले.

अनेक वर्षांपासून या ठिकाणी रक्ताचे पाणी केलेय, शिवसेनेने निवडणूक लढवली. मात्र यावेळी शिवसेनेला ही जागा मिळाली नाही. त्यामुळे राजीनामे देत असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. राजीनामे दिल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहेत. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या राजीनामामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनामामुळे महाविकास आघाडीत फूट पडली असून महाविकास आघाडीचे उमेदवाराला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close