क्राइम

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार , उपचारादरम्यान मृत्यू 

Spread the love

ठाणे / विशेष प्रतिनिधी

                   येथील ठाकरे गटाचे मानपाडा उपविभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्यावर गोळीबार झाला. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.या घटनेने ठाण्यात खळबळ माजली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रदीप पूर्णेकर हे मानपाडा येथील त्यांच्या कार्यालयात असताना दोन व्यक्तींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. पूर्णेकर यांच्यावर दोनपेक्षा अधिक गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कार्यालयाबाहेरच हा संपूर्ण प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.गोळीबारानंतर पूर्णेकर यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

प्रदीप पूर्णेकर हे मानपाडा, आझादनगर आणि गणेशनगर परिसरातील नागरिकांच्या एका प्रश्नासाठी आंदोलन करण्याच्या तयारीत होते. या आंदोलनासाठी त्यांनी परवानगी मागितली होती. मात्र, त्यांची परवानगी नाकारण्यात आली होती. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही केली होती.

घटनेची माहिती मिळताच कापूरबावडी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी सुरू केली आहे. गोळीबाराच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला, हल्लेखोर कोण होते आणि त्यांचा पूर्णेकर यांच्याशी काय संबंध होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close