सामाजिक

खा संजयजी धोञे यांच्या विकास कामाना आशीर्वाद व विरोधकाचा निगेटीव्ह प्रचाराला बळि न पडता मतदार व महायूतीच्या कार्यकर्त्यानी वीजय मिळवुन दिला – खा अनूप धोञे

Spread the love

 

 

अकोला / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीचे यश बूथ प्रमुख व महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यास समर्पित असून पंतप्रधान ना नरेंद्र मोदी व महायुतीच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या कामकाजावर खा. संजयभाऊ धोत्रे यांच्या विकास कामांना आशीर्वाद व कार्यकर्त्यांचा विश्वास या शक्तीपुळे विरोधकांनी मग नेगेटीव्ह प्रचार करून सुद्धा विजय महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मिळवून दिला या विजयाला तडा न देता विकास मतदार संघाचा करू अशी गाव्ही नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांनी दिली.
ते स्थानिक स्व. नामदेवराव पोहरे मराठा मंडळ कार्यालयात अकोला पूर्व व अकोला पश्चिम विधानसभा संघ व महायुतीच्या वतीने जनसंवाद आशीर्वाद, धन्यवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा प्रदेश सरचिटणीस आ रणधीर सावरकर तर मंचावर आ. हरीश पिंपळे, तुकाराम बिडकर, सुहासिनिताई धोत्रे, , चंदाताई शर्मा, वसंतराव खोटरे, बळीराम शिरस्कार, तेजराव थोरात, किशोर पाटील, डॉ. रणजीत सपकाळ, श्रीरंगदादा पिंजरकर , कृष्णा अंधारे, राजेश काळे, छावा संघटनेचे डॉ. शंकरराव वाकोडे, जयंत मसने, विजय अग्रवाल, कृष्णा शर्मा, सुलभाताई सोळंके, पंकज साबळे, अह्विन नवले, अश्विनी हातवळणे सुनील अवचार, योगेश अग्रवाल, शिवाजीराव देशमुख, विजय सोळंके, मंजुशाताई सावरकर, अर्चनाताई मसने, संजय गोट्फोडे, माधव मानकर, देवेंद्र देवर, राजेश रावणकर, देवाशिष काकड, उषा विरक, उमा शर्मा, वसंत बाछुका, संतोष पांडे, निलेश निनोरे, रमेश करीहार, गणेश अंधारे, दिलीप मिश्रा, संदीप गावंडे,अण्णासाहेब उमाळे, अर्चना शर्माआदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या वेळी प्रभाग ४ वेळी अनेक युवकांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. तसेच या वेळी रुपेश चौरसिया व सुभाष धोटे यांची महानगर सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली तर दामोदर घड्याळजी यांचेकडे दक्षिण – पश्चिम – उत्तर मंडळाचा जेष्ठ कार्यकर्ता संयोजक म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले. सतत ४.३० तास सत्कार समारंभ सोहळा सुरु होता. १२७ सामाजिक संघटना व विविध आघाड्या यांचे वतीने नवनिर्वाचित खासदार यांचा सत्कार करण्यात आला. तर आयोजन समितीचे विजय अग्रवाल, जयंत मसने, किशोर पाटील यांचे नेतृत्वात अयोध्या येथील बाळकराम यांच्या मूर्ती प्रदान करून नवनिर्वाचित खासदार यांचा सन्मान करण्यात आला.
विजयाचे शिल्पकार सावरकर – बीडकर म्हनाले
अकोला लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये योग्य नियोजन व महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या कर्तुत्वाचा योग्य तो वापर करून नवीन – नवीन शब्द व संस्कार भाजपाकडून शिकून समाज सेवा व सन्मान प्रक्रियामुळे व छोट्या गोष्टींचा व बूथ निहाय अभ्यास करून आमदार रणधीर सावरकर यांच्या अचूक अभ्यासू वृत्तीमुळे अकोला लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती ला विजय मिळाला व विजयाचे शिल्पकार आमदार रणधीर सावरकर असल्याचे माजी आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तुकाराम बिडकर यांनी विजयाचे विवेचन व विश्लेषण आपल्या वर्हाडीभाषेत करून कार्यकर्त्यांची मने जिंकली.
१४ दिवसात आपल्या कामगिरीने समाज व मतदारांसमोर आपल्या कर्तुत्वाची ओळख दाखवून भविष्यातील उज्वल नेतृत्व धोत्रे – आ. पिंपळे
१४ दिवसात २७ वेगवेगळे विभाग प्रसार माध्यम, अधिकारी, कार्यकर्ते वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांमध्ये आपल्या वडिलांच्या संस्क्रातून अभ्यासू वृत्तीचा परिचय देत शेतकरी – विद्यार्थी युवक रेल्वे,आरोग्य व्यापारी या भागातील समस्या जाणून तातडीने निकाली काढून आपल्या कामगिरीने समाज व मतदारांसमोर आपल्या कर्तुत्वाची ओळख दाखवून भविष्यातील उज्वल नेतृत्व अनुप धोत्रे असल्याचे कृतीने सिद्ध केले असे प्रतिपादन भाजपा आमदार हरीश पिंपळे यांनी केले. त्यांनी आपल्या जोशपूर्ण अभ्यासू वृत्तीने कार्यकर्त्यांचे माने जिंकून घेतले. या वेळी विजय अग्रवाल, श्रीरंग दादा पिंजरकर, पंकज साबळे, कृष्णा अंधारे, किशोर पाटील, संदीप पाटील बळीराम शिरस्कार, जयंत मसने, यांची समयोचित भाषणे झाली.
कार्यकर्ता, मतदार, राष्ट्रवाद चा विजय – आमदार सावरकर
महायुतीतील प्रत्येक कार्यकर्ता स्वतःला उमेदवार समजून मतदारांशी संवाद साधला. हा राष्ट्रवाद व कार्यकर्त्यांचा विजय असून कार्यकर्त्यांच्या विश्वासाला नमन व कार्यकर्त्यामुळेच अनुप धोत्रे यांनी उमेदवारी व विजयश्री प्राप्त होऊ शकली. प्रत्येक क्षेत्राचा विकास तसेच ५ टक्के मतदार विरोधांकडे गेले, का गेले? याचे विवेचन करून आगामी महानगरपालिका, विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला विजयी करण्यासाठी मंथन, चिंतन करून विजय प्राप्त करू शकलो. भविष्यात यशाचा प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढता प्रभाव वाढण्याचे दृष्टीने कार्यकर्ता व मतदार या मधील महत्वाचा दुवा म्हणून आपण काम करू असे अभिवचन आमदार रणधीर सावरकर यांनी करून खासदार संजयभाऊ धोत्रे यांचेवर विश्वास व लोकनेते भाऊसाहेब फुंडकर, व आ. गोवर्धन शर्मा यांना श्रद्धांजली देऊन त्यांचे कामाचा विश्वास व संघटन कौशल्याचा लाभ महायुतीच्या यशामध्ये महत्वाचे योगदान असल्याचे सांगून हिंदुत्व आमचा प्राण असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांचे अकोला लोकसभा संयोजक विजय अग्रवाल यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नगरसेवक व भाजपा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी, यांनी केले तर आभार प्रदर्शन जयंत मसने यांनी केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close