क्राइम

लग्न झालेल्या महिलेने पोलिसांसमोर ठेवली अशी अट की पोलिसांनी मारला डोक्यावर हात 

Spread the love

सीतापूर/ विशेष प्रतिनिधी

वर्तमान काळात विवाहबाह्य संबंधात कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आणि याचा सरळ परिणाम कुटुंबावर पडताना दिसत आहे. अनेक प्रकरणात तर महिला किंवा पुरुषाची हत्या हा नेहमीचाच प्रकार झाला आहे. लग्न झालेल्या महिलेला एका तरुणासोबत पर झाले. याची माहिती महिलेच्या पतीला मिळाल्यावर त्याने पोलिसात तक्रार दाखल केली. यावर पत्नीने पोलिसांसमोर अशी अट ठेवली की ऐकून पोलिसांनी कळपावर हात मारला. चला तर पाहू या काय आहे त्या महिलेची अट.

पत्नीने पोलिसांसमोर अट ठेवली की पती दिवसाचा कामाला जाईल तर प्रेमीसोबत राहू द्या, रात्री मी पतीसोबत असेन, महिलेने असा आपला दिनक्रम जाहीर करणारा ड्युटी चार्टच पोलिसांना सादर केला आहे.

पती आणि पत्नी यांचे नातं विश्वासावर टीकून असते. या विश्वासाला एकदा तडा गेला की पुन्हा तो मिळवणे कठीण असते. मात्र, जर एकाच छताखाली पती, पत्नी आणि प्रियकर राजीखूशी राहायला तयार असेल तर याला काय म्हणावे. अशी विचित्र केस पोलिसांकडे पोहचली तेव्हा पोलिस देखील चक्रावले. या महिलेने माझा पती दिवसाचा कामाला जात असतो, त्यामुळे आपण प्रियकरासोबत दिवसा राहू आणि रात्री आपण पुन्हा पतीसोबत राहू असा ड्युटी चार्टच पोलिसांना या महिलेने सादर केल्याने पोलिसांना डोके धरायची वेळ आली आहे.

सीतापूरच्या महमूदाबाद कोतवाली पोलिस ठाण्यात हे पती-पती विवादाचे प्रकरण पोहचले आहे. या प्रकरणात विशेष म्हणजे पती, पत्नी आणि महिलेचा प्रेमी तिघेही जण पोलिस ठाण्यात पोहचले. या वेळी आम्ही तिघेही एकत्र राहायला तयार आहोत. परंतू आपल्या दोन नणंदा आणि सासरे यासाठी तयार नसल्याचे या महिलेने म्हटले आहे. आता यावर पर्याय म्हणून या महिलेने दिवसा आपण बॉयफ्रेंड सोबत राहू आणि रात्री पतीसोबत राहू असा ड्युटी चार्टच सादर केल्याने पोलिसही चक्रावले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close