Uncategorized

लाच घेताना लिपिकास रंगेहाथ अटक

Spread the love

नाशिक  / नवप्रहार मीडिया 

           शाळेतील शिपायाला वेतन सुरू कायुन देण्यासाठी 50 हजारांची लाच घेणे एका लिपीकाला चांगलेच महागात पडले आहे. त्याला लाच घेताना ACB ने रंगेहाथ अटक केली आहे. लाच घेणारा कारकून शिक्षण उपसंचालक कार्यालयात कार्यरत आहे. 

शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केलीय. एका खासगी शाळेतील शिपायाला कुठलेही वेतन मिळत नव्हते, ते वेतन सुरू करुन देण्यासाठी नाशिकच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक दिगंबर अर्जुन साळवे (वय 55 रा. टाकळी) याने 50 हजाराची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदारानं लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडं तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा करत एसीबीच्या पथकानं शिक्षण उपसंचालक कार्यालयात दिगंबर साळवे याला 50 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक केलीय.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close