श्रीनाथ समर्थ हेल्थ केअर च्या वतीने निघोज येथे शनिवार दि . ६ ला शुभारंभ व मोफत सर्व रोग उपचार शिबीराचे आयोजन .
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – श्रीनाथ समर्थ हेल्थ केअर चा शुभारंभाच्या निमित्ताने निघोज येथे शनिवार दि . ६ रोजी सर्व रोग उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती निसर्गोपचार , योगोपचार व ॲक्युपंचर तज्ञ अशोक बाजीराव खोसे व मकरंद काशिनाथ गावडे यांनी दिली आहे .
शनिवार दि . ६ रोजी निघोज येथील लंके कॉम्पलेक्स येथे सुरू होत असलेल्या ” कैलासवासी बाजीराव गोविंद खोसे ” यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘श्रीनाथ समर्थ हेल्थ केअर ‘ चा शुभारंभ नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ . निलेश लंके यांच्या हस्ते व सुप्रसिद्ध ॲक्युपंक्चर तज्ञ डॉ योगेश कर्नावट व डॉ . सौ . प्रियंका कर्नावट यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शांताराम लंके , बाबासाहेब कवाद पतसंस्थेचे चेअरमन वसंतराव कवाद सर , सरपंच चित्राताई वराळ , माजी सरपंच ठकाराम लंके , माजी उपसरपंच उमेश सोनवणे , ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद , सदस्य दिगंबर लाळगे , गणेश कवाद , देवस्थान ट्रस्टचे सहसचिव विश्वास शेटे , राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे , पिंपळगाव रोठा खंडोबा देवस्थानचे विश्वस्त सुरेश फापाळे , उद्योजक सुनिल पठारे , मच्छिंद्र लंके , प्रगतशिल शेतकरी अशोक लंके , अनंतराव वरखडे सर , सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र सुपेकर सर , पाडळी दर्या चे सरपंच रामदास खोसे , डॉ . प्रदीप खोसे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
शनिवार दि . ६ रोजी शुभारंभ होत असलेल्या या उपचार शिबीरामध्ये श्री नाथ समर्थ हेल्थ केअर च्या वतीने प्रसिद्ध निसर्गोपचार, योगोपचार व ॲक्युपंक्चर तज्ञ अशोक खोसे , निसर्गोपचार व ॲक्युपंक्चर तज्ञ मकरंद गावडे व होमिओपॅथी कन्सल्टंट डॉ किर्ती सासवडे व इतर ॲक्युपंक्चर तज्ञ हे निसर्गोपचार , योगोपचार , ॲक्युपंचर , ॲक्युप्रेशर , सु – जोक , कपिंग , कायरो प्रॅक्टीक , रोप बेल्ट थेरपी , होमिओपॅथी , बायोकेम , बॅच प्लॉवर व इतर विविध पद्धतीने मान , पाठ , कंबर , खांदे , गुडघे , टाच दुखी , सायटिका , स्लिपडीस्क , संधीवात तसेच होमिओपॅथिक पद्धतीने लहान मुलांचे आजार , छातीचे विकार , पोटाचे विकार , त्वचा रोग , मुळव्याध , केस गळणे , झोप न येणे , मानसिक ताण – तणाव , स्त्रियांचे सर्व आजार , वजन वाढविणे , कमी करणे , अर्धशिषी , डोके दुखी , दाढ दुखी या व इतर विविध आजारांवर योग्य उपचार करतील . शनिवार दि . ६ रोजी शुभारंभा निमित्ताने संपूर्ण दिवसभर मोफत उपचार केले जातील , तरी संपूर्ण पारनेर तालुक्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा, अशी माहिती वजा आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नगर जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील यांनी केले आहे .