क्राइम

तो उच्चभ्रू सोसायटीत जाऊन  महिलांची छेड काढून व्हायचा पसार ; पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

Spread the love

मुंबई / विशेष प्रतिनिधी  

अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारची विकृती असते. ती पूर्ण करण्यासाठी संबंधित व्यक्ती कुठल्याही स्तरावर जातो. महिला आणि मुलींची छेड काढायची विकृती असलेला तरुणाला बांगर नगर पोलिसांनी महिला आणि तरुणींच्या तक्रारी नंतर बेड्या ठोकल्या आहेत. मुख्तार नसीर खान, (वय २३) असं या आरोपीचे नाव असून पोलिसांनी ४८ तासांच्या अथक परिश्रमानंतर आणि २९ सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीनंतर आरोपीला अटक केली.

तरुणाचा विकृत छंद..

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील उच्चभ्रू परिसरांमध्ये महिलांचा पाठलाग करून त्यांचा विनयभंग करणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाला बांगूर नगर पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा आरोपी चित्रपटसृष्टीत कार्यरत असून, स्वतःच्या विकृत छंदासाठी तो दुचाकीवरून येऊन महिलांना लक्ष्य करायचा.

मुख्तार नसीर खान असे या अटकेतील आरोपीचे नाव असून, तो गोरेगाव (पूर्व) येथील आरे कॉलनीत राहतो. ​गेल्या काही दिवसांपासून हा तरुण मुंबईच्या विविध भागांत महिलांचा विनयभंग करून पसार होत होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बांगूर नगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी तब्बल २९ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि ४८ तासांच्या अथक परिश्रमानंतर आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.

छेड काढून पळून जायचा, पोलिसांनी मुसक्या आवळल्या

तपासात आरोपीवर बांगूर नगर पोलीस ठाण्यात दोन आणि समता नगर पोलीस ठाण्यात एक असे एकूण तीन गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने आपल्या विकृत कृत्याची कबुली दिली आहे. “आरोपीला सुंदर महिला आणि मुलींचा विनयभंग करून पळून जाण्याचा एकप्रकारचा छंद जडला होता,” असे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, पोलीस आता याच्या कृत्यांचा अधिक सखोल तपास करत असून, त्याने मुंबईच्या इतर कोणत्या भागात अशा घटना घडवल्या आहेत का, याचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील निष्पन्न होणाऱ्या नवीन माहितीवरून आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close