क्राइम
रूम नंबर 204 आणि पोलिसांची धावपळ
शिक्षक आणि विद्यार्थिनीची अनोखी प्रेम कहाणी
लखनौ / नवप्रहार ब्युरो
एक व्यक्ती अचानक लखनौ येथील हॉटेल रेस्पिस्ट जे खेरेश्वर स्केअर वर आहे. च्या काउंटर वर धावत आला. वेळ दुपारची असल्याने तो घामाने घामाझोकळ झाला होता. त्याने धापा टाकत तेथील स्टाफ ला जे सांगितले ते ऐकून हॉटेल च्या स्टाफ ने रुम न 204 कडे धाव घेतली. खोलीतील दृश्य पाहून स्टाफ उलट्या पावली परतला. त्यानंतर पोलिसांना फोन लावला.आणि त्यांना घटनेची माहिती दिली. असे काय झाले होते की इतकी धावपळ माजली. चला तर जाणून घेऊ.
वास्तविक हॉटेल च्या काउंटर वर आलेला त्या व्यक्तीला.अलिगड मधील ज्वालाजीपुरम मधून त्याचा एका मित्राचा कॉल आला होता. त्याने सांगितले होते की त्याचा एक मित्र हॉटेल रेस्पिट मध्ये थांबला आहे. आणि त्याने अनुचित पाऊल उचलले आहे. तो मित्र जेव्हा हॉटेल च्या रूम नंबर 204 मध्ये पोहचला. तेव्हा तेथे एक तरुण आणि एक अल्पवयीन तरुणी खोलीत मृतावस्थेत आढळले.
यापैकी तरुण हा शिक्षक तर तरुणी ही विद्यार्थिनी होती. हॉटेलच्या खोलीत जमिनीवर सल्फाचे दोन रिकामे पाकिटही पोलिसांना आढळले. या दोघांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं असेल, असा प्रश्न पोलिसांसमोर होता.
अलीगढमधील ज्वालाजीपुरम भागातील रहिवासी चंद्रभान हा बी.टेक अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता.कुटुंबातील एकुलता एक मुलगा, त्याला तीन लहान बहिणी होत्या. अभ्यासासोबतच चंद्रभान त्याच परिसरातील एका शाळेत शिकवत असे. काही मुलं तर त्याच्याकडून क्लास घेण्यासाठी त्याच्या घरी येत असत. त्याच परिसरात एक 14 वर्षांची विद्यार्थिनी राहायची.जी चंद्रभानच्या शाळेत शिकत होती.
इतर विद्यार्थ्यांप्रमाणे ती देखील चंद्रभान च्या घरी जात होती. पण दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.आणि त्यांचे नाते शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या पुढे गेले.
मृत अल्पवयीन विद्यार्थिनीच्या कुटुंबात आजी-आजोबा, आई आणि 10 वर्षांचा धाकटा भाऊ आहे. तिला वडील नाहीत आणि आई खासगी नोकरी करून कुटुंबाचा खर्च चालवते. आईने तिच्या मुलीला कुटुंबाचा सन्मान तिच्या हाती असल्याचं सांगत हे प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न केला. तिचे क्लास बंद करण्यात आले आणि काही दिवस तिला शाळेतही जाऊ दिले नाही.
दुसरीकडे ती चंद्रभान च्या संपर्कात होती.
असेच काही काळ निघून गेला. त्यानंतर मुलीने तिच्या आईला आश्वासन दिले की ती पुन्हा असे करणार नाही आणि तिने पुन्हा शाळेत जायला सुरूवात केली. चंद्रभान यानेही त्याच्या घरी सांगितलं की आता त्या दोघांमध्ये कोणताही संबंध नाही.
पण, दोघांच्याही मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. 5 मे रोजी सकाळी विद्यार्थिनी शाळेसाठी घरून निघाल पण, ती शाळेत पोहोचलीच नाही. ती. चंद्रभानला भेटली आणि तो तिला हॉटेल द रॉयल रेस्पिटमध्ये घेऊन गेला. इथे चंद्रभानने त्याचा खरा आयडी दिला. पण, अल्पवयीन विद्यार्थिनीने मुस्कान राणाच्या नावाने आयडी दिला. मुलीचे जन्म वर्ष आयडीमध्ये 2002 असं दर्शवण्यात आलं होतं. त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना खोली दिली.दोघांनीही त्यांचे लग्न ठरल्याचे सांगितले होते. सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत ते त्याठिकाणी थांबणार होते. पण दोघांनीही विष प्राशन करत जीवन संपवले.