शिवसेना (UBT ) गटाच्या 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
मुंबई / नवप्रहार डेस्क
एकिकडे महायुतीतील घटक पक्ष भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण आज दुपार पर्यंत महाविकास आघडीतील कुठल्याही घटक पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली नव्हती. त्यामुळे इच्छुकांची उत्कंठा वाढली होती. पण आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (UBT ) गटाने 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
माहीम मतदारसंघातून अमित ठाकरेंविरुद्ध उद्धव ठाकरेंकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर, इतरही मतदारसंघातील नेतेमंडळी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत आहे. त्यामुळेच, शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडून नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्ह्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे चर्चेत असलेल्या शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासह, वसंत गितेंनाही ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
नाशिक जिल्ह्यातील नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि मालेगाव बाह्य मतदारसंघातील उमेदवारांना मातोश्रीवर एबी फॉर्म देण्यात आले आहेत. नाशिक पश्चिम मधून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात माजी आमदार वसंत गीते यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. तर, मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात दादा भुसे यांना आव्हान देणार शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांना ठाकरेंनी मैदानात उतरवलं आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने उमेदवारीवर दावा केला होात, हेमलता पाटील काँगेसकडून येथे इच्छुक होत्या. मात्र, ही जागा शिवसेनेला मिळाल्याची माहिती आहे.
नांदगावमधून गणेश धात्रक
शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून नांदगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांना शिवसेनेची (ठाकरे गट) उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, माजी खासदार समीर भुजबळ यांच्या ठाकरे गटाकडून उमेदवारीच्या आशा मावळल्या आहेत. नांदगाव मतदारसंघात आता शिवसेना शिंदे व ठाकरे गटात लढत होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. धात्रक हे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख व मनमाड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत. ठाकरे गटाची उमेदवारी गणेश धात्रक यांना जाहीर झाल्याने मतदारसंघात शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून आज कोणी कोणी एबी फॉर्म घेतले
1. सुधाकर बडगुजर(नाशिक पश्चिम)
2. वसंत गिते(नाशिक मध्य)
3. अद्वय हिरे (मालेगाव बाह्य)
4. एकनाथ पवार (लोहा कंधार)
5. के पी पाटील, राधानगरी विधानसभा
6. बाळा माने, रत्नागिरी विधानसभा
7. अनुराधा नागवडे, श्रीगोंदा विधानसभा
8. गणेश धात्रक, नांदगाव
9. उदेश पाटेकर, मागाठाणे विधानसभा
10. अमर पाटील, सोलापूर दक्षिण
11. दीपक आबा साळुंखे पाटील, सांगोला