साई भंडारा संपन्न!

मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्रातीलच नव्हे तर साऱ्या देशातील एक श्रध्दा स्थान म्हणजे शिर्डीतील श्रीसाईबाबा मंदिर. लाखो भक्तगण रोज श्रध्देने शिर्डीतील साईबाबांच्या चरणी लीन होतात. देशातील अनेक भाविक पदयात्रेने शिर्डी येथील आपल्या परमेश्वराच्या दर्शनासाठी जातात.
मुंबईतील हंस – राज – हंस साई सेवा मंडळाचे भाविक गेली पंधरा वर्षे मुंबई ते शिर्डी येथे पदयात्रेने आपल्या शिर्डी येथील मंदिरात जाऊन मनोभावे साईबाबांचे दर्शन घेतात. हंस-राज-हंस साई मंडळाचे अध्यक्ष शिवसेना शाखाप्रमुख श्री. दीपक सणस यांनी सांगितले केवळ हिंदू धर्माचे नव्हे तर इतर धर्माचे साई भक्त आमच्या सात दिवसाच्या पदयात्रेत सहभागी होतात. कोणताही धर्म, पक्ष संघटना यांच्या पलिकडे जाऊन एकत्र आनंदाने व धार्मिकतेने आमची पदयात्रा पार पडते व त्या नंतर साई मंदिरात साई भंडाराचे आयोजन करतो.
शिवसेना नेते माजी मंत्री आमदार अनिल परब, काँग्रेसचे माजी आमदार अशोक जाधव, शिवसेनेचे स्थानिक नेते संजय कदम, संजय पवार, माजी नगरसेविका श्रीमती ज्योत्स्ना दिघे, युवासेना पदाधिकारी रमेश वाजे यांनी या साईभंडाऱ्यास आवर्जून उपस्थिती लावली हजारो साई भक्तांनी महिप्रसादाचा लाभ घेतला.
आज साईबाबांचे वचन श्रध्दा व सबुरी या वचनाची सर्वांनाच गरज आहे असे मत शिवसेना नेते अनिल परब यांनी आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केले.