क्राइम

रुपये 3 हजार आणि चाकूचे सपासप वार 

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया नेटवर्क

                दक्षिण दिल्लीच्या तिगरी परिसरात एका 21 वर्षीय युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही हत्या 3 हजार रुपयांच्या वादातून झाल्याचे समजते. ही घटना घडत असताना एकाने या घटनेचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

युसूफ अली असं हत्या झालेल्या 21 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तर शाहरुख असं आरोपीचं नाव आहे. बुधवारी आरोपी शाहरुखने एका दुकानाच्या बाहेर युसूफवर चाकूने हल्ला केला. आरोपीनं पीडित तरुणावर अनेक वार केले. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी आरोपीला पकडलं आणि जखमी तरुणाची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. यानंतर जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

युसूफचे वडील साहीद अली यांनी पोलिसांना सांगितलं की, तीन ते चार दिवसांपूर्वी आरोपी शाहरुखने आर्थिक देवाणघेवाणीतून त्यांच्या मुलाला धमकी दिली होती. युसूफने काही दिवसांपूर्वी शाहरुखकडून तीन हजार रुपये उसने घेतले होते. याच पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून युसूफची हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close