खेळ व क्रीडा

रुट सचिन चा रेकॉर्ड तोडण्यापासून एक पाऊल दूर

Spread the love
 

सिडनी / नवप्रहार डेस्क

 ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातल्या ऍशेस 2025-26 चा पाचवा आणि शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू झाला आहे. या सामन्यात इंग्लंडने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर जो रूटने पहिल्याच दिवशी अर्धशतक ठोकलं. जो रूटचं टेस्ट क्रिकेटमधलं हे 67 वं अर्धशतक होतं. याचसोबत रूट सचिन तेंडुलकरच्या वर्ल्ड रेकॉर्डच्या आणखी जवळ पोहोचला आहे. आणखी एक अर्धशतक करताच रूट सचिनच्या विक्रमासोबत बरोबरी करेल. सचिन तेंडुलकरच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 68 अर्धशतकं आहेत.

सिडनीमध्ये अर्धशतक करताच रूटने वेस्ट इंडिजच्या शिवनारायण चंद्रपॉलला मागे टाकलं. चंद्रपॉलने टेस्ट क्रिकेटमध्ये 66 अर्धशतकं ठोकली होती. सचिन तेंडुलकरच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन, सर्वाधिक शतकं आणि सर्वाधिक अर्धशतकं आणि सर्वाधिक मॅच खेळण्याचा विक्रम आहे, पण आता सचिनचा सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम धोक्यात आला आहे.
जो रूट- 67 अर्धशतकं
शिवनारायण चंद्रपॉल- 66 अर्धशतकं
राहुल द्रविड- 63 अर्धशतकं
ऍलन बॉर्डर- 63 अर्धशतकं
रिकी पॉन्टिंग- 62 अर्धशतकं
सचिन तेंडुलकरने टेस्ट क्रिकेटमध्ये 119 वेळा 50+ स्कोअर केले आहेत, या रेकॉर्डमध्येही रूट सचिनच्या जवळ पोहोचला आहे. जो रूटने टेस्ट क्रिकेटमध्ये 107 वेळा 50+ स्कोअर केला आहे. रूटच्या बॅटने सातत्याने रन येत असल्यामुळे तो सचिनचा हा विक्रमही मोडण्याची शक्यता आहे
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close