शैक्षणिक

कु. रीद्धिमा राणे मुलींमधून प्रथम

Spread the love

 

आर्वी ,आष्टी व कारंजा तालुक्यातून मुलींमधून प्रथम येऊन उंचावला तपस्या शाळेचा मान..

आई-वडिलांसारखे मलाही व्हायचे आहे डॉक्टर

आर्वी / प्रतिनिधी.

नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी सीबीएससी बोर्ड परीक्षा मध्ये कु. रिद्धीमा रिपल राणे ही आर्वी, आष्टी व कारंजा या तिन्ही तालुक्यांमधून मुलींमधून प्रथम आली असून, या परीक्षेमध्ये कु रिद्धीमा हिने 95.4 % गुण मिळवून मुलीमधून प्रथम क्रमांक पटकाविला आहे, तीने इंग्लिश आणि सोशल सायन्स विषयामध्ये सर्वाधिक गुण घेऊन अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे.
कु रिद्धीमा हि तपस्या पब्लिक स्कूल आर्वीची विद्यार्थिनी असून तिने आपल्या शाळेचे नाव उंचाविले आहे , तिच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शिवानी देशपांडे व तिच्या शाळेच्या सर्व शिक्षक वृंदानी तिचे कौतुक केले आहे .
कु. रिध्दीमा ही आर्वि येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. रिपल राणे व प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. कालिंदी राणे यांची कन्या असून तिच्या या यशाबद्दल आर्वी,आष्टी कारंजा परिसरातून सर्वांद्वारे शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. कु. रिद्धिमा हिला तिच्या यशाबद्दल विचारल्यास तिने संपूर्ण श्रेय आपल्या आई वडिलांना व तिच्या सर्व शिक्षकांना दिले आहे .
यापुढे मला वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करायचा असून मला आई-वडिलांसारखेच डॉक्टर होऊन गरीब व गरजूंची सेवा करायची आहे असे प्रतिपादन तिने याप्रसंगी केले.✍️

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close