शैक्षणिक

विश्वस्नेह फाउंडेशन व्दारा 12 वीच्या विद्यार्थ्यांना घाटंजीत करीअर मार्गदर्शन शिबीर संपन्न.

Spread the love

 

 

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार.

दिनांक 4/1/2024 रोज गुरुवार ला विश्वस्नेह फाउंडेशन घाटंजी र.न. 0000094/2023 (राष्ट्रनिर्माण विचार धारा)आणि शारदा क्लासेस प्रताप नगर चौक नागपुर यांच्या संयुक्त वतीने घाटंजीत एस.पी.एम.विज्ञान काॅलेज घाटंजी व समर्थ विज्ञान घाटंजी येथिल 12 विद्यार्थ्यांना करीय मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात शारदा क्लासेस नागपुरचे तज्ञ संचालक नारायण शर्मा सर यांचे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बाबतीत मौलिक मार्गदर्शन लाभले.

या शिबिरात सरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा व 12 वी नंतर करावयाच्या औद्योगिक, शैक्षणिक, आय आय टी, मॅथम्याटी,निट परिक्षा करीता तयारी बाबत मार्गदर्शन केले. सध्या मोबाईल फोन वापर व चटकन गुगलवर पाहिजे ते मिळण्याच्या झटापटीत विद्यार्थी वाचन व लिखाना सोबतच मैदानी खेळ यापासून दूरावत आहे त्यामुळे शारीरिक व मानसिक, बौद्धिक परिपक्वता पाहिजे तसी न होता मोबाईल चा दूषपरीणाम होतो आहे. पुस्तकी ज्ञाना शिवाय बौद्धिक परिपक्वता कायम टिकाव धरु शकत नाही हे ही त्यांनी मार्गदर्शन करताना आवर्जून सांगितले. यावेळेस एस.पि.एम व समर्थ विदोन्ही काॅलेजचे प्राचार्य,प्रध्यापक त्याच प्रमाणे विद्यार्थी बहूसंखेणी उपस्थित होते. या ज्ञानदानाचे मार्गदर्शन शिबिरास विश्वस्नेह फाउंडेशनच्या टिमने मोलाचे सहकार्य केले.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close