क्राइम

मामीच्या प्रेमावर भारी पडले गर्लफ्रेंड चे प्रेम 

Spread the love

मामीची हत्या करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळला

दागिने विकून आलेल्या पैशात गर्लफ्रेंड ला घेऊन गेला गोवा 

बेंगळुरू / नवप्रहार मीडिया 

                    तारुण्यात आलेल्या तरुणाईला एकमेकांप्रति आकर्षण हा नैसर्गिक प्रक्रियेचा एक भाग आहे. पण प्रेमात आंधळे झालेले काही लोक खूपच खालचाया स्तरावर जातात. आम्ही आपणाला आता ज्या प्रकारणाबद्दल सांगणार आहोत ते प्रेमात वेड्या झालेल्या युवकाचे असून त्याने आपल्या प्रेयसीला गोवा फिरायला नेण्यासाठी आपल्या मामीची हत्या केली आणि तिचे दागिने विकून प्रेयसीला गोव्याला घेऊन गेला.

या प्रकरणातील आरोपीचे नाव यशवंत असून तो बेंगळुरुच्या विजयवाडामधील एका अभियांत्रिकीमध्ये तो बीटेक करत आहे. 11 फेब्रुवारी रोजी तो आपल्या मामाच्या घरी गेला होता.

यशवंतचा मामा नरसिम्हा रेड्डी हे बेंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटी टेक्नॉलॉजी हबमध्ये राहतात. त्यादिवशी यशवंत मामाच्या घरी गेला होता, मात्र त्यावेळी त्याचा मामा घरी नव्हता. त्यांची पत्नी सुकन्या रेड्डी घरी होत्या.

यशवंतचे त्याच्या मामीशी चांगले संबंध होते. त्यामुळे तो अनेकदा आपल्या मामाच्या घरी जात येत होता. 11 फेब्रुवारी रोजी यशवंतने त्याच्या मामीकडे त्याने खर्चासाठी पैसे मागितले होते.
त्याची कार खराब झाली असून मला ती दुरुस्त करुन घ्यायची असल्याचेही त्याने सांगितले. मात्र त्यावेळी त्याच्या मामीकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याला पैसे दिले नाही. त्या गोष्टीचा त्याला राग आला होता. मात्र त्याने तो बोलून दाखवला नाही.

पैसे दिले नाहीत त्या रागातच त्याने मामीची हत्या करून पैसे उकळायचा कट रचला. त्याप्रमाणे त्याने मामीची हत्या केली आणि एका पोत्यात भरून त्याने निर्जनस्थळी घेऊन जाऊन पेट्रोल टाकून जाळून टाकले.

या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, पैशासाठी त्याने स्वतःच्या मामीची हत्या करून एका निर्जनस्थळी त्यांचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळून टाकण्यात आला.

त्यानंतर त्याने मामीचे सगळे दागिने चोरून काही दागिने त्याने विकले वर तो मैत्रिणीला घेऊन गोव्यालाही गेला. त्या काळात त्याच्या मामाने आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली.

मामाने आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनीही तपास सुरु केला. त्यावेळी त्यांच्या यशवंतचे नाव पुढे आले. त्यानंतर तपास केला असता काही मृताचे काही दागिने त्याच्याकडे सापडले व काही दागिने त्याने विकल्याचे कबूल केले.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close