पेन्शनर्स असोसिएशनचे रविवार ला स्नेहसंमेलन

वाडी (प्र): देशात 17 नोव्हेंबर ला पेन्शनर्स दिवस उत्साहात साजरा केला जातो. वाडी- नागपूर परिसरातील पेन्शनर्स चे अधिकार व हितासाठी कार्य करणाऱ्या सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिलियन पेन्शनर्स वेल्फेयर असोसिएशन द्वारा पेन्शनर्स साठी वार्षिक स्नेहसंमेलना चे आयोजन आयुध निर्माणी अंबाझरी स्थित समाज सदन सभागृह येथे रविवार दिनांक 17 नोव्हेंबर ला करण्यात आले आहे .
या संदर्भात अधिक माहिती देतांना असोशियन चे अध्यक्ष जे.पी शर्मा तथा सचिव पि के मोहनन यांनी सांगितले की पेन्शनर असोसिएशन च्या पेन्शनर्स दिवस कार्यक्रमात वाडी,नागपूर परिसरातील 1 हजार पेक्षा अधिक पेन्शनर्स उपस्थित राहणार असून सकाळी 9 वा. स्नेहसंमेलनाचे उदघाटन आयुध निर्मानि अंबाझरीचे महाप्रबंधक अंजनकुमार मिश्रा व इतर अतिथींच्या हस्ते सम्पन्न होईल .त्या नंतर नागपूर येथील हॉस्पिटलचे निमंत्रित चिकित्सक उपस्थित पेन्शनर्स ना आरोग्य सम्बधी व चिकीत्सा सुविधांची माहिती देणार आहेत.
तसेच अतिथीच्या हस्ते विवाहाला 50 वर्ष पूर्ण झालेल्या पती-पत्नीचा व 80 वर्ष पूर्ण करणाऱ्या पेन्शनर्सला स्मृतिचिन्ह ,शाल देऊन सत्कार केल्या जाईल.
कार्यक्रमात असोसिएशन द्वारा प्रकाशित वार्षिकांचे प्रकाशन अतिथीच्या हस्ते संपन्न होणार आहे.अशी माहिती असोशियनचे पदाधिकारी एन पी भानुसे ,डी आय रामटेके ,जे एम पराते ,डी एम कोल्हे ,के जी कुहीकर , पी बी इटारे,एच डी गणवीर, यु एम क्षीरसागर ,ए एन वर्गटी वार इ. नी पत्रपरिषदेत दिली.व पेन्शनर्स यांनी कार्यक्रमात उपस्थिती चे आवाहन केले.