डेंगुच्या आजारांवर त्वरीत उपाययोजना व शाळा महाविद्यालये येथे जनजागृती करा

सामाजिक कार्यकर्ते सारंग कहाळे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदनातून मागणी.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी तालुक्यातील डेंगु सदूर्क्ष स्थिती पाहता आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्ण संख्या वास्तविक परिस्थिती पाहता ज्वर, डोकेदुखी,थंडीचा ताप,खोकला ह्या लक्षणांचे रुग्ण संख्या वाढत आहे.नुक्तेच घाटंजी तालुक्यातील पांढूर्णा येथिल एका विद्यार्थिनीचा डे़ंगुच्या आजाराने मृत्यू झाल्याचे वृध्दय हेलकावणारी दूखद घटना घडली अशात शासनाने घाटंजी तालुक्यात कुठेही डेंग्यूच्या आजाराचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून येते नाही.एक सामाजिक कार्यकर्ता, पालक म्हणून सारंग कहाळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून या आरोग्य बाबत गंभीर विषयावर वरिष्ठांकडून गांभीर्याने लक्ष पुरवले जावे यासाठी लेखी निवेदन देऊन जनसमस्याला आरोग्य सुविधा विषयक माहितीपर जागृती व शाळा महाविद्यालये येथे डेंगीच्या आजाराचे निदान जागृती सोबत मोफत तपासणी शिबारिचे शासनाने आयोजन करावे यासाठी जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.