राजकिय

अजित दादा तडकाफडकी दिल्ली रवाना ; हे आहे त्या मागील कारण

Spread the love
शिंदे आणि फडणवीस देखील जाण्याची शक्यता
मुबई / पी. संजू
               एकिकडे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाकॅग्या विस्ताराची चर्चा सुरु असताना आणि तो आज उद्यात होईल असे वाटत असतांना अजित दादा हे तडकाफडकी दिल्ली रवाना झाल्याने पवार- शिंदे- फडणवीस सरकार मध्ये काही वाद आहेत काय ? असे बोलले जात आहे. पण या मागील कारण मात्र वेगळे असल्याचे समोर येत आहे.
काँग्रेस चा एक गट फुटण्याच्या तयारीत – सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार काँग्रेस चा एक गट फुटण्याच्या तयारीत असून तो शिंदें – फडणवीस सरकार मध्ये भागीदार होणार आहे. या फुटीर गटाला तीन मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे समजते. कदाचित याच विषयावर चर्चा करण्यासाठी अजित दादा दिल्ली कडे रवाना झाल्याचे बोलल्या जात आहे.
 आ. बच्चू कडू यांनी दिले होते संकेत–  मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी प्रमाणे काँग्रेस चा देखील एक गट फुटण्याच्या तयारीत असल्याच्य चर्चेला उधाण आले होते.अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी देखील तसे संकेत दिले होते .पण काँग्रेस कडून हे फेटाळून लावण्यात येत होते. पण सध्या सुरू असलेल्या घडामोडी वरून यात तथ्य असल्याचे समोर येत आहे.
याच कारणामुळे खरगे यांनी बोलावली होती दिल्लीत बैठक – आपण फेटाळून लावत असलेल्या आरोपात तथ्य असल्याचे काँग्रेस च्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा माहीत होते. पण ते हे आरोप फेटाळून लावत होते. दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलावलेली बैठक ही नाराज लोकांची समजूत घालण्यासाठी बोलावली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close