पोलीस चौकी गोंडऊमरीत अन् कारभार ठाण्यात
भंडारा/गोंडऊमरी : परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता गोंडऊमरी येथे पोलीस चौकी आहे पण चौकीचे कर्मचारी येथे हजर न राहता चौकीचा कारभार ठाण्यातूनच चालवित असल्याने सदर पोलिस चौकी ही नियमित बंद असते.
साकोली पोलीस ठाण्याअंतर्गत गोंडऊमरी येथे सन -1995 मध्ये पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली. गोंडऊमरी परिसर हा साकोली तालुक्यातील शेवटच्या टोकावर असून साकोली पोलीस ठाण्यापासून 22 कि. मी. अंतरावर आहे. या चौकी अंतर्गत गोंडऊमरी,पळसगाव, वांगी, चिंगी,महालगाव, सुकळी,वडदसह 14 ते 15 गावांचा समावेश आहे. या चौकीची स्थापना झाली तेव्हा पासून ही पोलिस चौकी ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलाच्या इमारतीच्या खोलीत संसार थाटून आहे.या चौकीच्या इमारतीसाठी जागाही राखीव ठेवण्यात आली आहे.त्या जागेच्या सभोवताली संरक्षण भिंत उभारण्यात आले आहे.मात्र अजूनही पोलिस चौकीची स्वतंत्र इमारत बांधण्यात आली नाही.जेव्हा या पोलिस चौकीची स्थापना करण्यात आली तेव्हा काही वर्ष ही पोलिस चौकी नियमित सुरू राहायची.त्यात एक पी.एस.आय.व चार पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.ते नियमित चौकीत हजर राहायचे.मात्र हा भाग नक्षलग्रस्त भागात येत असल्याचे कारण पुढे करून वरिष्ठांनी कार्यरत पोलिस कर्मचारी रात्रपाळीत राहण्यास मनाई केली होती.तेव्हा पासून या चौकीला नजर लागली अन् अमावस्या पौर्णिमेसारखी ही चौकी एखादेवेळी सुरू राहत आहे.बाकीचे दिवस नियमित कुलूप बंद असते.गोंडऊमरी येथील पोलीस चौकीचे कार्यरत कर्मचारी या ठिकाणी हजर राहत नाहीत.यामुळे या परिसरात मागील काही दिवसांपासून अवैध व्यावसायिकांनी ठिकठिकाणी अवैध धंदे सुरू केल्याचे दिसून येत आहे. गोंडऊमरी येथे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय , रेल्वे स्टेशन,बॅक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याम