क्राइम

पारधी वस्तीवर राडा; १९ वर्षीय तरुणाची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या 

Spread the love

मुर्तिजापूर / विशेष प्रतिनिधी 

                      शहरातील हिरपूर रोडवर असलेल्या सिरसो गायरान ( पारधी वस्तीत)  परिसरात झालेल्या दोन गटाच्या राड्यात एका १९ वर्षीय तरुणावर कुऱ्हाडीचे घाव घालत हत्या करण्यात आली. यात आठ लोक गंभीर जखमी झाले आहेत. तरुणावर असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून घटना घडल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीवरून मूर्तिजापूर शहर नजीक हिरपूर रोडवर असलेल्या सिरसो गायरान (पारधी वाडा) परिसरात ता. २५ मार्च रोजी सकाळी सहा ते सात वाजताच्या सुमारास अनैतिक संबंधाच्या संशयावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. या घटनेत एका १९ वर्षीय युवकाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या करण्यात आली, तर या वादात इतर आठ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. रेणुका दयावान घोसले (वय ३०, रा. सिरसो गायरान) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे भासरे चंदू दामू घोसले परिवारासह सिरसो गायरान येथे राहतात. त्यांच्या मुलीचे पती राहुल चव्हाण यांचे प्रदीप किशोर घोसले यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून वाद निर्माण झाला. या वादाचा निपटारा ता. २४ रोजी ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये झाला होता.

परंतु, ता. २५ मार्च रोजी हाच वाद पुन्हा उफाळला. या वादाचे रूपांतर क्षणातच हाणामारीत होऊन यामध्ये सूरज चंदू घोसले (वय १९) या युवकावर कुऱ्हाडीने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. व इतर सात ते आठ जण गंभीररित्या जखमी झाले. जखमींना उपचारार्थ येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारार्थ सर्वोपचार रुग्णालयात हालवण्यात आले. घटनेमुळे सिरसो गायरन परिसर व श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयास पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

फिर्यादीच्या फिर्यादीवरून राज निर्दोष घोसले (वय २२), दीपक लक्ष्मण पवार (वय ३०), प्रदीप किशोर घोसले (वय २५), करण किशोर घोसले यांच्यावर कलम १०३ (१), १०९, ३५१ (२) ३५२, ३ (५) बीएनएस नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे, पीएसआय श्री. वानखडे, पीएसआय श्री.सामतकर, एएसआय संजय खंडारे, एएसआय श्री.लांजेवार, रितेश मड्डी, शंकर खेडकर, गणेश ठाकरे, सुदाम धुळगुंडे करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close