Uncategorized

याठिकाणी कैद्यांना मिळणार पती -पत्नी सोबत एकांतात मिळण्याची संधी 

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया 

           कैदी म्हटला की डोळ्यासमोर उभी राहते ती तुरुंगाची उंच भिंत. चारी बाजूने कडेकोट पोलीस पाहारा आणि रात्री जगते रहो चा आवाज . समजा जर आपला नातेवाईक किंवा मित्र जर तुरुंगात असला तर त्याला भेटण्यासाठी वेळ घावी लागत होती.तीही मोजकीच मिळते.पण आता देशातील एका राज्यात कैद्यांना पती पत्नी सोबत एकांतात वेळ देण्यावर विचार सुरू आहे. 

           जगातील असे अनेक देश आहेत ज्यामध्ये कैद्यांना त्यांच्या जोडीरादाला एकांतात भेटण्याची परवानगी आहे. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्याबाबत प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे प्रस्तावही पाठवण्यात आल्याचे दिल्ली सरकारने म्हटले आहे. या संकल्पनेला वैवाहिक भेटीअसं म्हणातात. ज्या नियोजित भेटी असतात ज्यामध्ये कैद्याला त्याच्या कायदेशीर जोडीदारासोबत एकांतात वेळ घालवण्याची परवानगी असते.

             सरन्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्या खंडपीठाने दिल्ली सरकारला त्यांच्या शिफारसीनंतर घडामोडींची माहिती देण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. न्यायालयाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी पुढील वर्षी 15 जानेवारी 2024 ही तारीख निश्चित केली आहे.

               यापूर्वी, मे 2019 मध्ये या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती. 2019 मध्ये, उच्च न्यायालयात वकील अमित साहनी यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती, ज्यामध्ये कैद्यांना त्यांच्या जोडीदाराला भेटण्यासाठी तुरुंगात आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश दिल्ली सरकार आणि तुरुंग महासंचालकांना देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या

        तांत्रिक भाषेत याला वैवाहिक हक्क म्हणतात. आपल्या जोडीदारासोबत राहणे हा प्रत्येक पती किंवा पत्नीचा हक्क आहे. या संकल्पनेनुसार कारागृहातील कैद्यांना त्यांच्या जोडीदारासोबत काही काळ एकांतात घालवण्याची संधी दिली जाते. त्याच्या बाजूने अनेक युक्तिवाद अनेकदा केले जातात. याचा कैद्याच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असल्याचा दावा अनेक संशोधनांमध्ये करण्यात आला आहे. असेही म्हटले जाते की जोडीदाराचा त्याच्या/तिच्या जोडीदारासोबत खाजगी क्षण घालवणे हा मुलभूत अधिकार आहे. किंबहुना, कैद्यांबाबत संयुक्त राष्ट्रांच्या मानकांमध्येही या गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे.

              अनेक देशाच्या तुरुंगांमध्ये, कैद्यांना त्यांच्या भागीदारांना खासगी जागेत भेटण्याची परवानगी आहे. यामध्ये कॅनडा, जर्मनी, रशिया, स्पेन, बेल्जियम, सौदी अरेबिया, डेन्मार्क, अमेरिका आणि इस्रायलच्या काही राज्यांचा समावेश आहे. काही देशांमध्ये समलैंगिकांनाही हे अधिकार मिळाले आहेत

 
 
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close