क्राइम

पैसे उसन वारी च्या वादातून एकाची निर्घृण हत्या तर दुसरा गंभीर जखमी

Spread the love

राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी

तालुक्यातीलग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम धनसळ येथे आज दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी अंदाजे ९ वाजताच्या सुमारास धनसळ ग्रामपंचायतच्या परिसरात एका ३७ वर्षीय इसमाची गळा चीरून निर्घृण हत्या करण्यात आली एक जण गंभीर जखमी झाला आहे.
सुरेश मल्हारी कवडे वय ३७ वर्ष ग्रामपंचायत कर्मचारी राहणार धनसळ असे मृतकाचे नाव आहे तर मृतकाच्या मदतीला गेलेल्या मित्र प्रवीण सात्विक थिटे वय २६ वर्ष राहणार धनसळ असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरेश कवडे वय ३७ वर्ष राहणार धनसळ व प्रवीण सात्विक थिटे वय २६ वर्ष राहणार धनसळ हे दोघे मित्र ग्रामपंचायत धनसळचे आवारात उभे असताना घटनेतील आरोपी खंडू लक्ष्मण गुळवे हा त्यांच्या मागून आला गळ्यात हात टाकून सुरेश कवडे यांच्या धारधार चाकूने गळा चिरला तर बाजूलाच असलेल्या प्रवीण सात्विक थिटे हा सुरेश कवडे याला वाचवायला गेला असता आरोपीने त्याच्यावर सुद्धा चाकूने सपासप वार केले .प्रविन सात्त्विक थिटे याच्या डोळ्या जवळ वार झाल्याचे प्रथमदर्शी व्यक्तींनी सांगितले आहे. घटना घडताच आरोपी हा घटनास्थळावरून पसार होण्यास यशवी झाला. सुरेश कवडे व प्रवीण सात्विक थिटे यांना ग्रामस्थांनी उचलून खाजगी रुग्णालयात नेले असतात तेथे सुरेश कवडे यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. तेथून सुरेश कवडे याला शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आले व प्रवीण सात्विक थिटे यास मेडिकेअर हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले. त्याची सुद्धा प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांमार्फत सांगण्यात आले आहे. मृताकने आरोपीला उसने पैशे न दिल्याच्या राग मनात धरून आरोपीने सदर हत्यकांड घडून आणल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close