ब्रेकिंग न्यूज

आणखी एक मॅच चा नाद आणि निवृत्तीचा गेम  खलास

Spread the love
मित्राची मित्राला बॅट ने मारहाण , मित्राचं गेला जीव
अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीतील चिखली टोली गावातील  घटना
पोलिसांचे तपास चक्र सुरू
संजीव भांबोरे
भंडारा 
              आणखी एक मॅच खेळण्याचा नाद निवृत्तीच्या जीवावर बेतला आहे. करण ने क्रिकेट वरून उद्भवलेल्या वादात निवृत्तीला बॅट ने मारहाण केल्याने निवृत्तीचा जीव गेला आहे. वडिलांच्या तक्रारी वरून पोलिसांनी करण क्या विरोधात भादवी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 उपलब्ध माहिती नुसार अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिखली  टोली येठे  आज दिनांक ( 5 नोव्हेंबर ) ला  १.३० वाजेच्या सुमारास दोन खेळाडू मध्ये आपसात वाद  होऊन तो वाद इतका विकोपाला गेला की ,आरोपी नामे करण रामकृष्ण बिलवणे वय 21 राहणार चिखली  याच्या मारहाणीत  निवृत्तीचा जीव गेला आहे.
                  निवृत्तीनाथ गोपीचंद कावळे (24) आणि करण रामकृष्ण बिलवणे (21) दोघेही रू. चिखली टोली,ता. पवनी हे मित्रांसोबत गावातील मैदानात क्रिकेट खेळत होते. त्यांच्यात एक मॅच खेळण्यावरून वाद झाला.
 या कारणावरून आरोपीने मृतकाच्या हातातील क्रिकेट खेळण्याचे बॅटने मृतकाच्या पायावर मारले तेव्हा मृत खाली वाकला. त्याच वेळी आरोपीने पुन्हा बॅट मृतकाला मारण्यास उगारली असता मृतकाच्या मानेवर डावे बाजूला लागली. त्यामुळे मृतक जागेवर बेशुद्ध पडला .त्यास उपचाराकरिता ग्रामीण रुग्णाल अड्याळ  येथे  भरती केले असता उपचारादरम्यान मरण पावला. फिर्यादी प्रसाद रामकृष्ण धरमसहारे वय 23 राहणार चिखली  यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्ट व ठाणेदार साहेब यांच्या आदेशाने सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे . कायमी अपराध क्रम 242 /२०२३ कलम 302 भादवी नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे .पोउपनी हेमराज सोरते/ बन 401 यांनी दाखल केला असून तपास सपोनी राऊत करीत आहेत .
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
4
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close