आता फक्त एकच चर्चा ओबीसीच्या हक्कासाठी महामोर्चा घाटंजीत ओबीसीच्या विविध मागण्या संदर्भात बैठक संपन्न.

*आता फक्त एकच चर्चा ओबीसीच्या हक्कासाठी महामोर्चा*
*घाटंजीत ओबीसीच्या विविध मागण्या संदर्भात बैठक संपन्न.*
*२६.नव्हेबर ला ओबीसींच्या मागण्यांसाठी महामोर्चा.*
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
दी. २.११.२३ रोजी घाटंजी तालुका ओबीसी जनमोर्चा व ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी ओबीसींच्या न्याय हक्कासाठी व येत्या २६ नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथे होत असलेल्या ओबीसी महामोर्चा संदर्भात आढावा बैठक घाटंजीत संपन्न झाली. या सभेत बोलताना सतिश भोयर यांनी मार्गदर्शन करतांना शासन बोलत नाही आधीच लोकसंखेच्या प्रमाणात ओबीसी समाजाला त्यांचे न्यायप्रविष्ट प्रमाणात आरक्षण नाही. त्यासोबतच ओबीसी जातीनिहाय जनगणना करण्यात शासन तत्परता दाखवत नाही उलट ईतर समाजाच्या दबावाखाली येत आधीच भरीव असलेल्या ओबीसींत ईतर जातीचा समावेश करण्याच्या मानसिकतेत शासन दीसत असून आता ह्या अन्याय बळी ओबीसी जागरूक समाज बांधव सहन करणार नाही.ओबीसीसमाजच्या न्याय हक्काच्या व पुढील पिढीच्या भविष्यासाठी आता आम्ही रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय नाही हे मत प्रास्ताविक येथून व्यग्त केले.कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष सतिश मलकापूरे होते तर प्रमुख मार्गदर्शक ॲड. राजेंद्र महाडोळे, लक्ष्मीकांत लोडगे, साहेबराव जुनघरे, हरीष कुडे, होते.महाडोळे यांनी सध्या ओबीसींच्या वाट्याला २७% असले तरी प्रत्यक्षात केवळ १९ % वाटायचं मिळत असुन शासनाचे धोरण हे ओबीसींच्या संदर्भात नाक मुरडत असलेल्या नकट्टी प्रमाणे असल्याचे मत मांडले.आता ओबीसी पिछडा शोषीत वर्ग व ओबीसी अलुतेदार बलूतेदार समाजाला रस्त्यावर उतरून लढले लागेल असेही मत मांडले. या सभेला अनंत चौधरी, मधुकर निस्ताणे, सुनिल देठे,प्रशांत नित,सुभाष गोडे, पांडुरंग निकोडे,संजय ढगले,विवेक डेहनकर,अरुन कपिले,चावरे सह ईतरही पदाधिकारी उपस्थित सभेचे आयोजन मधूकर निस्ताणे व संचालन सचिन कर्णेवार यांनी केले.