हटके

सोशल मीडियावर व्हायरल होतोय ब्लॅक पँथर चा व्हिडीओ हे आहे कारण

Spread the love
नवी दिल्ली  / नवप्रहार मीडिया 

               जंगली पशु शहरात किंवा गावात शिरल्याच्या अनेक घटना घडतात.यात कधी पाळीव पशु आणि मनुष्यावर हल्ल्याच्या घटना घडतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक ब्लॅक पँथर एका घराजवळ पोहचून ते घरात डोकावत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे घरचे लोकं या प्रकारापासून अनभिज्ञ आहेत. एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ बनवत तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो जबरदस्त व्हायरल होत आहे.आणि त्यावर युजर्स च्या प्रतिक्रिया देखील येत आहेत.

X युजर किशोर चंद्रन (@tweetKishorec) यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, पाहा कोण गुपचूप निलगिरीतील कुन्नूरजवळच्या घरात घुसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला एका घरासमोरील अंगण दिसत आहे, ज्याच्या एका बाजूचा दरवाजा बंद आहे. काही क्षणांतच या साध्या दृश्याला भितीदायक वळण मिळतं जेव्हा एक काळा बिबट्या तिथून जातो. व्हिडिओमध्ये ब्लॅक पँथर आजूबाजूला पाहत शांतपणे चालताना दाखवलं आहे. हे पाहून लोक हैराण झाले
सीसीटीव्हीत कैद झालेला हा व्हिडिओ शेअर होताच व्हायरल झाला. काही तासांतच तो 75 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला. हा व्हिडिओ पाहून अनेकजण घाबरले. मात्र, काहींनी लिहिलं की त्यांना जंगल बुकमधील काल्पनिक पात्र बघिराची आठवण झाली. एकाने लिहिलं, बघिरा मोगलीला शोधत आहे. हा ब्लॅक पँथर दिसणं फारच दुर्मिळ! दुसऱ्याने कमेंट केली, त्या घरात जर कोणी असेल तर त्या व्यक्तीला बसलेल्या धक्क्याची कल्पना करा. त्यांचं काय झालं असतं. हे खरोखर खूप भीतीदायक आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close