Uncategorized

मोटार वाहन अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी रंगीत तालीम

Spread the love

राष्ट्रीय महामार्ग ५३ वरिल गडेगाव महामार्ग पोलिस केंद्राचा उपक्रम…
भंडारा– महामार्ग पोलिस केंद्र गडेगाव जिल्हा भंडाराच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग ५३ वर मोटार वाहन अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी व जखमींचे प्राण वाचावे तसेच अपघातामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्यास त्याबाबत योग्य नियोजन करून उपाययोजना करता याव्या याकरिता नुकतीच रंगीत तालीम घेण्यात आली.
महामार्ग पोलिस केंद्र, गडेगाव येथे अपघाताची माहिती प्राप्त होते. दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले हे स्टाफसह पेट्रोलिंगवर असतांना राष्ट्रीय महामार्ग 53 वर जांभळी ते मोहघाटा दरम्यान ट्रक व दुचाकीमध्ये अपघात झाल्याची त्यांना माहीती मिळते. त्यानंतर ते तातडीने स्टाफसह रवाना होवून घटनास्थळी पोहचतात,तेव्हा त्यांना ट्रक व दुचाकीमध्ये अपघात झालेला दिसुन येतो. दुचाकी चालकाच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव होवून तो बेशुद्ध पडल्याचे दृश्य दिसताच व अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक पाहता, सर्वप्रथम 108 वर कॉल करून अँम्बुलन्सला पाचारण करणे त्याचप्रमाणे अशोका टोल प्लाझा (नाका) साकोली येथील हेल्पलाईन नंबरवर कॉल करून, तेथील पेट्रोलिंग स्टाफ व ट्रक बाजुला करण्यासाठी क्रेनची मागणी करणे व स्थानिक पोलिसांना माहीती कळविली जाते. दरम्यान अपघातातील जखमीस प्रथमोपचार देत असतांना, काही वेळातच स्थानिक पोलीस व अशोका टोल प्लाझाची अँम्बुलन्स घटनास्थळी दाखल होताच, जखमीस तात्काळ अम्बुलन्स ने ग्रामीण रुग्णालय साकोली येथे उपचारासाठी रवाना करणे. तसेच क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजुला करून विस्कळीत झालेली वाहतुक सुरळीत करणे इत्यादी. या रंगीत तालिममध्ये पोलिस केंद्र गडेगाव येथील अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले, पोलिस उपनिरीक्षक नितीन आगाशे, याचेसह अन्य कर्मचारी व अशोका टोल नाका येथील स्टॉपसह डॉक्टर यांचा सहभाग होता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close