विहीगांव येथे स्वच्छता ही सेवा पंधरवडा .व गांधी जयंती साजरी
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
स्वच्छता ही सेवा पंधरवाडा अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा विहीगाव येथे पंधरवाड्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात
निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे ,शौचालयाची सफाई, शाळा परिसर साफसफाई, तसेच स्वच्छतेची प्रतिज्ञा घेण्यात आली .स्वच्छता ज्योत सौ जयश्रीताई पोटदुखे सरपंच ग्रामपंचायत विहिगाव ,श्री उमेशजी गोरडे ,श्री संतोष गावंडे ग्रामपंचायत सदस्य . श्री प्रशांतजी बोरोळे अध्यक्ष , धनंजय पोटदुखे ,नीताताई तायडे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या उपस्थितीत स्वच्छता ज्योत पेटवून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला .महात्मा गांधी
व लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या दिवशी स्वच्छतेवर विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करून स्वच्छतेचा संदेश दिला दोन महान नेत्यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी जीवनप्रसंगातून आपले विचार व्यक्त केलेत.विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले व शाळेतील स्वच्छता मॉनिटर विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग घेऊन स्वच्छता ही सेवा स्वच्छता ही संस्कार या ब्रीद वाक्याप्रमाणे कार्य करण्याची शपथ घेतली . कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री सुधीर खोडे शिक्षण विस्तार अधिकारी पं.स.अंजनगाव हे होते ..स्वच्छता ही सेवा
पंधरवाड्यात विनायक दाभाडे मुख्याध्यापक, अर्चना गणोरकर ,मीना धरमठोक, सुजाता रूपनारायण, गीतांजली गायकवाड ,अर्चना चिंचोळकर व स्वप्निल ढवळे यांनी मोलाचे सहकार्य करून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण केली.