नांदगाव खंडेश्वर येथे शिवसैनिकांचा बस स्टाॅप परिसर जल्लोष
फटाके फोडुन पेढे वाटून निकालाचा आनंदोत्सव

नांदगाव खंडेश्वर तालुका प्रतिनिधी / पवन ठाकरे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्रतेच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा एकच जल्लोष व्यक्त केला.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवसैनिक बस स्टॉप परिसरामध्ये फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला आनंद उत्सवामध्ये नारे लावण्यात आले एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है जय भवानी जय शिवाजी जय श्री राम शिवसेना जिंदाबाद असे लावन्यात आले.
त्यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील केने उपजिल्हा संघटक रणजीत पाटेकर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अरुणा इंगोले उपजिल्हाप्रमुख माया देशमुख, जयश्री कातकिडे, नांदगाव खंडेश्वर महिला तालुका अध्यक्ष पवनीत कौर शिवसेना तालुकाध्यक्ष सुधीर खंडार, उप तालुकाध्यक्ष अमोल शिरभाते उप तालुकाध्यक्ष धामणगाव रेल्वे राजेश मारवे तालुका संघटक विलास धांडे शहर अध्यक्ष मनोज जैन युवा सेना तालुका अध्यक्ष पवन ठाकरे, युवासेना उप तालुका प्रमुख कांतेश्वर नागोलकर, सुशिलचंद्र येवतीकर,अंकीत सोनगडे, जिवन मारोटकर,
यासह असंख्य कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला,