वाहन चालकांचे “हिट अँड रन” कायद्या विरोधात ठिय्या आंदोलन
वंचीत- बहुजन आघाडी च्या नेतृत्वात ५ दिवस धरणे!
वाडी / नागेश बोरकर
: केंद्रातील भाजप सरकार ने नुकत्याच पारित केलेल्या वाहतुकी शी सम्बधित हिट एंड रन च्या कायद्यातील नियमा नुसार अपघाताला कारणीभूत चालकाला ७ लाख रुपये दंड व १० वर्षाची शिक्षा अशी तरतूद केली आहे .याला काळा कायदा संबोधून या विरोधात देशभरातील ट्रान्सपोर्ट सह चालकात बराच आक्रोश निर्माण झाल्याचे दिसत आहे.मोदी सरकारने गत आठवड्यात आकस्मिक वाहन चालकांच्या जाम आंदोलनाची दखल घेत तात्पुरत्या स्वरूपात हा कायदा स्थगित केला. परंतु वाहनचालकाना भीती आहे की केंद्र सरकार हा कायदा पुन्हा लागू करू शकते.त्या मुळे हा कायदा कायमचा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी देशभर आंदोलने सुरू झाली आहे.
याचनुसार वाडी येथे एम.आय.डी.सी.वळणावर वंचीत बहुजन युवा आघाडी नागपूर जिल्हा च्या वतीने ५ दिवसीय ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.शनिवारी वाहन चालकांनी या काळ्या कायद्या विरोधात सरकारला काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी करीत निषेध आंदोलन केले.
ठिय्या आंदोलन १३ ते १८ जानेवारी पर्यंत नियमित सुरू राहणार असल्याचे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनीष बोरकर यांनी सांगितले. या कायद्या मुळे चालक,मालक व वाहतूक व्यवसायिक यांना असुरक्षित वाटत आहे. देशातील ट्रक व इतर वाहन चालकांमध्ये या नवीन कायद्याने भिती व चिंतेचे वातावरण पसरले आहे.
यावेळी ट्रांसपोर्टर व वाहन चालकानी एकत्रित येऊन ठिय्या आंदोलन केले.जोरदार नारे लावून काळ्या कायद्याचा निषेध व्यक्त केला.
सदर कायदा हा संपूर्ण रद्द व्हावा या मागणीसाठी या ५ दिवसीय ठिय्या आंदोलना च्या माध्यमातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न वंचीत बहुजन युवा आघाडी करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष मनीष बोरकर यांनी सांगितले.केंद्र सरकार ने त्वरित हा कायदा रद्द करावा अन्यथा या विरोधात उग्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलन कर्त्यांनी यावेळी दिला.
वाडी येथील ठिय्या आंदोलनात ट्रान्सपोर्टस् अखिलेश सिंग,रमेश भेंडारकर,बबलू गोपाळे
विश्वजीत भाऊ मेश्राम,राजकुमार पख्खिडे, अभिजीत पडघम, विनय उमाटे,सोपान तोडसाम,फारुख भाई कुरेशी, दिलीप चोपडे,नरेश चोपडे, सुरज वानखेडे, किशोर मेश्राम, अविनाश नंदेश्वर, बिट्टू नायडू,राजू सावरकर,गोवर्धन कोहळे,मनोहर भाऊ ठाकरे, दीपक वानखेडे, नरेंद्र महाले,दिलीप बगडते, रोहित राऊत, मनोज भाऊ कांबळे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.