तेल्हारा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी. अग्रिस्टॅक योजने अंतर्गत नोंदणी योजनेचा लाभ घ्यावा- तहसीलदार

तेल्हारा / प्रतिनिधी
शासनाच्या विविध कृषी संलग्न योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीने व अधिक प्रभावीपणे पोहोचवण्या साठी अॅग्रिस्टॅक योजनें तर्गत शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक दिला जात आहे.जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नजीकच्या नागरी सुविधा केंद्रावर (सिएससी सेंटर) नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करण्याचे आवाहन तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे यांनी केले आहे. अकोला जिल्ह्यात 16 डिसेंबर पासून अॅग्रिस्टॅक’ डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेद्वारे शेतकरी माहिती संच तयार करून प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) दिला जाणार आहे.फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) का आवश्यक आहे यायची माहिती देताना तहसीलदार सोनवणे यांनी सांगितले की, अग्रिस्टॅक योजनेत नोंदणी केल्याने शेतकऱ्यांना पीक विमा, पीक कर्ज, पीएम किसान सन्मान निधी आणि विविध सरकारी अनुदान योजनांचा लाभ सहज मिळू शकतो. या आयडीच्या मदतीने शेतकऱ्यांना वारंवार प्रमाणिकरण (C-KYC) करण्याची गरज राहणार नाही.फार्मर आयडीसाठी आवश्यक कागदपत्रेआधार कार्ड, आधारशी व बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक,सातबारा उतारा किंवा नमुना 8नोंदणी प्रक्रिया शेतकऱ्यांनी वरील आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या नागरी सुविधा केंद्र (CSC) येथे जाऊन नोंदणी करावी असे आवाहन तहसीलदार समाधान सोनवणे यांनी केले आहे.