सामाजिक

नागपूर–अमरावती हायवेवर दर्ग्यासमोरील चबुत-यावर चक्क अस्वल दिसले

Spread the love

वर्धा जिल्ह्यात नागपूर–अमरावती हायवेवर इंदरमारी दरगा परिसरात एक धक्कादायक दृश्य पाहायला मिळालं. दर्ग्यासमोरील चबुत-यावर चक्क अस्वल दिसल्यानं प्रवासी आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. अस्वलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. हा महामार्ग जंगलालगत असल्यामुळे जंगली प्राणी वारंवार रस्त्याच्या कडेला या परिसरात येत असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. या भागात अनेक मंदिरं आणि धार्मिक स्थळे असल्याने भाविकांची इथे सतत वर्दळ असते. अशा परिस्थितीत वन्य प्राण्यांचा मुक्त संचार नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत आहे. प्रशासन आणि वन विभागानं तातडीनं उपाययोजना करून या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close