मुस्लिम समाजाला हिंसाचाराच्या घटनेची माहिती होती ?

नागपूर / विशेष प्रतिनिधी
नागपूर येथे उसळलेला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याची पोलिस विभागाला घटना घडल्या पासून शंका आहे. असे असताना नुकत्याच घडलेल्या एका घटनेनंतर पोलिसांच्या या शंकेला दुजोरा मिळाला आहे. दंगल घडण्यापूर्वी एका युट्यूबर पत्रकाराने केलेल्या चित्रीकरणामुळे आणि तो व्हिडिओ आता व्हायरल होत असल्याने हा विषय चर्चेत आला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही दंगल पूर्वनियोजित होती हे विधानसभेत सांगितले आहे.
नागपूरमध्ये अचानक उसळलेल्या दंगलीनंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी आतापर्यंत हजारो लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, यास मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी नकार देत आहेत. शनिवारी सायबर पोलिसांनी आणखी दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात एक युट्यूबर पत्रकाराचाही समावेश आहे. मोहम्मद शहजाद खान असे त्याचे नाव असून त्याने संपूर्ण घटनेचे लाइव्ह चित्रिकरण केले आहे. याचा अर्थ त्याला असे काही घडणार होते हे आधीच ठावूक होते का ? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी मोहम्मद शहजाद खानला अटक केली आहे. त्याच्यावर दोन धर्मात तेढ निर्माण करणे, घटनेचे व्हीडिओ तयार करून व्हायरल करणे, शांतता भंग करणे आदी गुन्हे त्याच्यावर नोंदवण्यात आले आहेत. या घटनेचा व्हीडिओ तब्बल एक ते सव्वा लाखाच्या लोकांनी बघितल्याचे समोर आले आहे.
औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने सोमवारी दुपारी आंदोलन केले होते. त्यानंतर नागपूर शहरातील वातावरण बिघडण्यास सुरुवात झाली. सायंकळाच्या सुमारास तणाव वाढला. महाल व हंसापुरी भागात अचानक दीड ते दोन हजार जणांचा जमाव धावून आला. त्यांनी तुफान दगडफेक केली.
रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड केली. या परिसरात असलेल्या दुकानांसमोरील सीसीटीव्ही फोडले. ही घटना रोखण्यास गेलेल्या पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. त्यामुळे शहरातील अचानक परिस्थिती बिघडली.
पोलिसांनी तातडीने शहर बंद केले. रात्री आठ वाजताच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. सर्व काही शांत झाले असे वाटत असताना रात्री बाराच्या सुमारास हंसापुरी भागात पुन्हा दंगल उसळली. असा काही प्रकार घडणार हे कोणाच्याही ध्यानमनी नसताना प्रत्येक घटनेचे चित्रिकरण मोहम्मद खानने कसे केले ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
त्याला असे काही होणार असल्याचे आधीच माहिती होते का? त्याचे चित्रीकरण करण्यासाठी तो त्या भागात आधीच पोहचला होता असावा. त्याच्या चित्रिकरणात या भागात घडलेल्या दंगलीचे बारिकसारिक माहिती उपलब्ध आहे. मोहम्मद खान हासुद्धा या कटात सहभागी असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.