बलात्काराची घटना ताजी असतानाच स्वारगेट बस स्थानकात आणखी एक कांड

बलात्काराची घटना ताजी असतानाच स्वारगेट बस स्थानकात आणखी एक कांड
प्रतिनिधी / नाशिक
स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर करण्यात आलेल्या बलात्कारामुळे अख्खे राज्य ढवळून निघाले होते. सध्या ही प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या घटनेची शाई अद्याप वाळायची असतानाच या बस स्थानक परिसरात आणखी एक कांड घडले आहे. चला तर पाहू या नेमके काय घडले ?
… स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका प्रवासी तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. पीडित तरुणी आपल्या गावी जाण्यासाठी पहाटे स्वारगेट बस स्थानक परिसरात आली होती.येथील एका बाकड्यावर बसून ती बसची वाट पाहत होती. यावेळी घटनास्थळी आलेला सराईत गुन्हेगार दत्ता गाडेनं तिला ताई म्हणत विश्वास जिंकला. तिला गोड बोलून एका बसजवळ नेलं आणि तिथे अत्याचार केला.
स्वारगेट अत्याचार प्रकरण समोर आल्यानंतर काही वृत्तवाहिन्यांनी राज्यातील विविध एसटी स्थानकात जाऊन रिअॅलिटी चेक घेतला होता. संबंधित बस स्थानकं महिलांसाठी किती सुरक्षित आहेत. हे तपासलं होतं. या वेळी नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकातील एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात संबंधित तरुण दारुच्या नशेत होता. आपल्यामुळे कोणतीही महिला असुरक्षित नाहीये, असा बडेजाव या तरुणाने कॅमेऱ्यासमोर मारला होता. तसेच त्याने दारुच्या नशेत पत्रकारांशी हुज्जत घालण्याचा देखील प्रयत्न केला होता. या प्रकारची व्हिडीओ क्लीप रील्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पण पोलिसांनी काहीच दखल घेतली नाही.
आता त्याच तरुणाचा एक कांड समोर आला आहे. त्याने नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकात घुसून एका स्वच्छता कर्मचाऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. शुभम जगताप असं या आरोपीचं नाव आहे. तो अनेकदा दारु पिऊन या बस स्थानक परिसरात येत होता. यावेळी स्वच्छता कर्मचारी विजय गेहलोत यांनी त्याला हटकलं होतं. तू बस स्थानकात दारु पिऊन येऊ नको, तुझ्यामुळे आमची बदनामी होते, असा दम त्यांनी दिला होता. हाच राग मनात धरुन आरोपी एका पिशवीत पेट्रोल घेऊन बस स्थानकात आला. त्याने पिशवीतील पेट्रोल विजय यांच्या अंगावर ओतून त्यांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या आगीच्या घटनेच विजय हे ६० टक्के भाजले आहेत. पोलिसांनी आरोपी शुभम जगतापला अटक केलीय. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
रिअॅलिटी चेक करत बस स्थानकातील वास्तव मांडूनही पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलं. पोलिसांनी वेळीच गुर्दुल्यांवर कारवाई केली असती तर आजची घटना घडली नसती. ज्याने पेट्रोल टाकून जाळलं, तो सराईत गुन्हेगार आहे. वेळीच त्याला आवर घातला असता तर आज त्याची ही हिंमत झाली नसती. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.