सामाजिक

चांदूर नगर परिषद प्रांगणात् बसणार डॉ.आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा

Spread the love

उत्तमराव गवई यांच्या प्रयत्नाल अखेर यश
-कार्यक्रम नियोजनाची पार पडली बैठक
-जिल्ह्यतून लाखो अनुयायी येतील चांदूर रेल्वेत
चांदुर रेल्वे तालुका प्रतिनिधी
-नगर परिषद प्रांगणात् डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृति पुतळा बसवण्यासाठी मागील 17 वर्ष्या पासून समाजसेवी उत्तमराव गवई यांनी सरकार कड़े मागणी केली होती.या मागणी कड़े नगर परिषद प्रशासन लक्ष देत नसल्याने गवई यांनी तहसील कार्यालय पुढे अनेकदा उपोषण, आंदोलने केले.याची दखल घेत अखेर पुतळा उभारणी करिता नप ने प्रस्ताव मंजूर केला. महाराष्ट्र शासनाच्या पूर्ण परवानगी मिळाल्या अखेर उत्तमराव गवई यांच्या आन्दोलनाला यश आले.
नप प्रांगणात पुतळया करिता चबूतरा तयार करण्यात आला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुणे येथे पुतळा तयार झाला असून आता फक्त वाट आहे फक्त उद्द्घाटनाची .
गुरुवारी मूलबंध कुटी विहारावर उत्तमराव गवई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.बैठकीत युवका सह महिलांचा मोठा सहभाग होता.
बैठकीत पुतळा आगमन आयोजन,पुतळा उद्दघाटन व 14 एप्रिल भीम जयंती कार्यक्रम आयोजनावर चर्चा करण्यात आली.नगर परिषद प्रशासन पुतळा बसवत असल्याने उद्घाटन जबाबदार त्यांची आहे.मात्र जिल्ह्यातील बौध्द उपासक उपासिका भीम सैनिकांनी सुद्धा कार्यक्रमाचे वेगळे नियोजन करतील व त्यात लाखोंच्या संख्येत नागरिक उपस्थित राहतील अशी माहिती
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अध्यक्ष
उत्तमराव गवई यांनी दिली.
बैठकीत उत्तमराव गवई,नानासाहेब डोंगरे,माजी नगरसेवक बंडु आठवले,विजय खवसे,प्रकाश रंगारी,प्रेमचंद अंबादे,संदीप बगाडे, इंद्रपाल बनसोड, युवक वानखड़े ,मेश्राम यांनी आपले मत मांडले.
पुढील नियोजन व कार्यक्रम समित्याची नियुक्त 20 फेब्रुवरीच्या बैठकीत होणार असल्याची माहिती गवई यांनी दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close