क्राइम

मुलींना मॉडेल बनविण्याचे स्वप्न दाखवत बनवायचे पॉर्न व्हिडिओ 

Spread the love

नोएडा / नवप्रहार ब्युरो 

                        वृत्तपत्र आणि सोशल मीडियावर नोएडा येथील पती – पत्नी तरुणींना मॉडेल च्या जाहिराती देऊन आकर्षित करीत होते. त्यांना घरी बोलवून जास्त पैशाचे आमिष देत त्यांचे  पॉर्न व्हिडिओ शूट करायचे. हे व्हिडिओ ते परदेशात पाठवत होते.इतकेच काय तर पॉर्न साईट वर देखील अपलोड करीत होते.

उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव या जोडप्याची अश्लील कृत्यं जसजशी उघडकीस येत आहेत, तसतसे पॉर्न कंटेंटच्या या दलदलीची खोली उघड होत आहे. नोएडामध्ये एक फ्लॅट भाड्याने घेऊन आणि तिथे राहून, उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव हे जोडपे मुलींना फोन करून अश्लील व्हिडिओ, म्हणजेच पॉर्न व्हिडिओ शूट करायचे.

घरात पॉर्न व्हिडिओ शूट करण्यासाठी एक योग्य स्टुडिओही चालू करण्यात आला होता. पण म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाने (ED) फ्लॅटवर छापा टाकताच सर्व काही उघडकीस आले.

रेकॉर्ड केलेले पॉर्न व्हिडिओ कुठे पाठवायचे?

या प्रकरणाच्या तपासात असे दिसून आले आहे की, उज्ज्वल आणि नीलू रेकॉर्ड केलेले पॉर्न व्हिडिओ परदेशातही पुरवत होते. त्यांच्याकडे एक संपूर्ण नेटवर्क होते आणि हे जोडपे या व्हिडिओंसाठी परदेशातून मोठ्या प्रमाणात पैसे घेत होते.

XHamster सारख्या पॉर्न साइट्सवर अपलोड करायचे Video

तपासात असे दिसून आले आहे की, हे जोडपं त्यांच्यासमोर जे अश्लील व्हिडिओ शूट करायचे ते XHamster सारख्या अनेक पॉर्न साइट्सवर अपलोड करायचे. हे सर्व व्हिडिओ त्यांच्या फ्लॅटमध्येच शूट करण्यात आले होते.

तपासात असेही समोर आले आहे की, जोडप्याला पॉर्न व्हिडिओसाठी मिळालेल्या पैशांपैकी फक्त 25 टक्के पैसे मॉडेल्स आणि मुलींना देण्यात यायचे. उर्वरित 75 टक्के पैसे हे जोडपं स्वतःसाठी ठेवायचं. या प्रकरणात 15.66 कोटी रुपयांचा बेकायदेशीर परदेशी चलनातील व्यवहार देखील उघडकीस आला आहे.

छाप्यादरम्यान मॉडेल्स देखील सापडल्या

असे सांगितले जात आहे की, जेव्हा ईडीने फ्लॅटवर छापा टाकला तेव्हा काही मॉडेल्स देखील तिथे उपस्थित होत्या. अशा परिस्थितीत, ईडीने त्या मॉडेल्सचे जबाबही नोंदवले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या जोडप्याने आतापर्यंत त्यांच्या फ्लॅटमध्ये शेकडो मुलींचे अश्लील व्हिडिओ शूट केले आहेत.

मोठ्या कमाईचे आमिष दाखवून मुलींना करायचे आकर्षित

तपासात असे समोर आले आहे की, उज्ज्वल आणि नीलू श्रीवास्तव सोशल मीडियाद्वारे मुलींना फसवत होते. मॉडेल्सच्या भरतीसाठी जाहिराती देण्यात यायच्या. एकदा मुली त्यांच्याकडे आल्या की, ते त्यांना मोठ्या कमाईचे आमिष दाखवून हळूहळू पॉर्न व्यवसायात ढकलले असे. या जोडप्याने आतापर्यंत अनेक मुलींचे पॉर्न आणि अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. पण आता या जोडप्याचा काळा धंदा जगासमोर आला आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close