जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अजय जीरापुरे यांनी रेखाटलेले माता रमाई चे चित्र
कधी शौर्याची ढाल
कधी मायेची ऊबदार शाल,
प्रत्येक स्त्रीच्या
आत्मविश्वासाला सलाम..!
पुरुषांच्या तुलनेत नेहमीच महिलांचे कष्ट जास्त राहिले.पण तिच्या कर्तृत्वाची दखल आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीने कधी घेतली नाही.कालौघात काहींनी बंधन झुगारून उंबरठ्याबाहेर पाऊल टाकलं. स्वतःशी आणि समाजाशी संघर्ष करत आपलं असं आभाळ बनवलं की तिची आकाशभरारी क्षितिजापार गेली तरीही आई, बहिण, पत्नी, मुलगी ही निसर्गनिर्मित पाऊलवाट मात्र कायम राहिली.या निसर्गदत्त देण्यालाही पुरेपूर खरं उतरून आपली ओळख कायम राहावी यासाठी तिचे हे कष्ट आजही अव्याहत सुरूच आहेत…*
*महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडविण्यात रमाईचा सिंहाचा वाटा आहे. रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावली. रमाईने आपले जीवन बाबासाहेबांच्या कार्यांप्रती समर्पित केले नसते तर बाबासाहेबांना शून्यातून जग निर्माण करता आले नसते, हे नाकारता येत नाही. बाबासाहेबांच्या जीवनात अत्यंत कठीण काळात रमाईने त्यांना खंबीरपणे साथ दिल्यामुळेच बाबासाहेबांना आपल्या कोट्यवधी अस्पृश्य बांधवांचे जीवन फुलविता आले..
से.फ.ला.हायस्कूल,धामणगाव रेल्वे जिल्हा – अमरावतीचे कलाशिक्षक – चित्रकार अजय जिरापुरे यांनी दिनांक-8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने “माता रमाई”चे व्यक्तीचित्र फलक रेखाटन करून त्यांच्या अपूर्व त्यागाला त्रिवार वंदन केले आहे व सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत…