Uncategorized

मोर्शी पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी

Spread the love

घरून निघून गेलेल्या मुलाचा आठ तासात लावला शोध

मोर्शी /तालुका प्रतिनिधी

मोर्शी शहरातील कॉलनी परिसरात राहणाऱ्या एक तेरा वर्षाचा मुलगा घरात दिसून न आल्याने पालकांनी याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आठ तासात या मुलाचा शोध लावल्याची घटना मोर्शी शहरात घडली.
शहरातील कॉलनी परिषदेतील 13 वर्षीय शाळाकरी मुलगा घरून अचानक बेपत्ता झाल्याची घटना दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी, 3:30 वाजताच्या सुमारास घडली येथील पोलीस स्टेशन येथे दिनांक 1मार्चला फिर्याद दिली की, शहरातील एका शाळेत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 3: 30 वाजताच्या दरम्यान घरून कोणाला न सांगता कुठेतरी निघून गेला व तो रात्री उशिरापर्यंत घरी परत आला नाही. त्याचे नातेवाईकाकडे शोध घेतला असता तो कुठेच मिळून आला नाही.
याबाबत मोर्शी पोलिसांनी कलम 137( 2 ) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे प्रगटीकरण पथक प्रमुख पोउपनि बुरकुल तसेच अंमलदार छत्रपती करपते,स्वप्निल बास्कर यांनी सदर मुलाचा शोध घेणे सुरू केले. व अवघ्या आठ तासांमध्ये त्याचा शोध घेऊन त्याला दुर्गवाडा शिवारातून ताब्यात घेऊन पालकाचे स्वाधीन करण्यात आले.
सदरची कारवाही पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस, अधीक्षक पंकज कुमावत,उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन देशमुख मोर्शी यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशन मोर्शी येथील पोउपनि अमोल बुरकुल पोलीस अंमलदार छत्रपती करपते, स्वप्निल बायस्कर,पंकज साबळे, विलास कोहळे यांनी केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close