क्राइम

कॉलेजला जायला निघालेल्या तरुणीला एकट्यात गाठले आणि…..

Spread the love

प्रतिनिधी, मुंबई 

                    मुंबईच्या मुलुंड मधून एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सकाळी कॉलेजला निघालेल्या तरुणीला एकटी पाहून एका व्यक्तीने तिचा पिछा केला. आणि सुनसान व झाडी झुडूप असलेल्या ठिकाणी तिला ओढत नेऊन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. तिने प्रसंगावधान राखत आईला कॉल केला. आईने लगेच घटनास्थळावर पोहचून आरडाओरड केल्याने नराधम पळून गेला. या प्रकरणाने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी आरोपीला सहा तासात अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड भागात राहणारी एक तरुणी पहाटे कॉलेजला जायला घराबाहेर पडली होती. तिला एकटीला पाहून नराधमाने तिचा पाठलाग केला आणि कमी वर्दळीच्या आणि झाडी-झुडपांनी व्यापलेल्या रस्त्यावर नराधमाने तरुणीला नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ६ ऑगस्ट रोजी पहाटे मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैशाली नगर परिसरात ही घटना घडली होती.

या घटने दरम्यान प्रसंगावधान राखत तरुणीने तत्काळ आईला फोन केला. त्यानंतर आईने घटनास्थळी धाव घेत आरडाओरड केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता. या घटनेनंतर घटनेनंतर पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल सहा तपास पथके तयार केली गेली.

यावेळी घटनास्थळ आणि आसपासच्या परिसरातील सुमारे 250 सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीची ओळख पटवून अनिल करोटिया या आरोपीला अटक केली. या प्रकरणी आरोपीविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. पण या घटनेने एकच खळबळ माजली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close