विशेष

मेट्रोत पुन्हा प्रेमी युगलाच कृत्य ; महिला प्रवाश्याने झापले

Spread the love

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया 

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया

           मागील काही काळात मेट्रोत प्रेमी युगलांकडून सुरू असलेल्या अश्लील चाळ्यांमुळे सोशल मीडियावर मेट्रो ट्रेन मधील व्हायरल होणाऱ्या व्हीडीओ ला घेऊन ट्रेन चांगलीच चर्चेत आहे. सोबत मेट्रो प्रबंधनाला घेऊन ताशेरे सुद्धा ओढल्या जात आहे. नुकताच मेट्रो मधला आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक महिला एका प्रेमी युगलाल झापतांना दिसत आहे. या व्हिडीओ वर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला मेट्रोमध्ये रोमान्स करणाऱ्या जोडप्याला झापताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे जोडपे मेट्रोमध्ये एकमेकांच्या गालाला चिमटे घेत होते, तसेच इतर कृत्य करत होते. यामुळे महिला संतापली आणि तिने सर्वांसमोर त्या जोडप्यावर राग काढला. तुम्ही अशा गोष्टी बाहेर जाऊन करा, असं महिला व्हिडिओमध्ये म्हणत आहे.

या घटनेवर लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी महिलेचे समर्थन केले, तर काहींनी त्या जोडप्याचे समर्थन केले. विशेष म्हणजे, यापूर्वी यापेक्षाही विचित्र व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काही व्हिडिओमध्ये किसिंग तर काहींमध्ये त्याच्याही पुढे गेल्याचे दिसत आहे. अशा घटनांमुळे प्रशासनावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close