Uncategorized

डॉक्टरी पेशाला काळीमा ,डॉक्टरने ३ लाखात १० दिवसाच्या बाळाला विकले 

Spread the love

गोंदिया /विशेष प्रतिनिधी

ज्याला जमिनीवरील देव मानतात त्याच डॉक्टरने डॉक्टरी व्यवसायाला काळीमा फासणारा प्रकार केला आहे. त्याने त्याच्या कडे आलेल्या एका गरीब दाम्पत्याच्या १० दिवसाच्या बाळाचा १० लाखात सौदा केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉक्टर फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहे.

मालती वाघमारे नामक महिलेला बाळ विकले –

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया येथील बालाजी हॉस्पिटलमध्ये एका गरीब दाम्पत्याने आपल्या १० दिवसांच्या मुलीला उपचारासाठी दाखल केले होते. हीच संधी साधून डॉ. नितेश बाजपेयी याने ‘उपचाराचा खर्च खूप जास्त होईल’ अशी भीती गरीब पालकांना घातली. त्यानंतर नागपूरच्या एका स्वयंसेवी संस्थेमार्फत मुलीवर मोफत उपचार करून देतो, असे खोटे आश्वासन देऊन त्याने बाळाला आपल्या ताब्यात घेतले. मात्र, या नराधम डॉक्टरने मुलीला उपचारासाठी न पाठवता, भंडाऱ्याच्या पांढराबोडी येथील मालती वाघमारे नामक महिलेला ३ लाख रुपयांत विकले.

भंडाऱ्याच्या महिला व बालविकास विभागाला पांढराबोडी गावात एका महिलेकडे संशयास्पद रित्या १० दिवसांचे बाळ असल्याची गोपनीय माहिती मिळाली. अधिकारी चौकशीसाठी पोहोचले असता संबंधित महिलेने पळ काढण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत बाळाला ताब्यात घेतले आणि तपासाची चक्रे फिरवली असता या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.

पाच जणांवर गुन्हा –

या प्रकरणी डॉ. नितेश बाजपेयी, ललेश्वरी सादेपाच, मालती वाघमारे, पौर्णिमा धुर्वे आणि उमेशसिंग गहलोत या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी ललेश्वरी सादेपाच हिला पोलिसांनी अटक केली असून, मुख्य आरोपी डॉ. बाजपेयीसह इतर चार जण सध्या फरार आहेत. तपासात समोर आले की, ३ लाखांपैकी १ लाख रुपये रोख आणि १ लाखाचा धनादेश मध्यस्थाच्या खात्यात जमा झाला होता, तर उर्वरित १ लाख रुपये ५ फेब्रुवारीला दिले जाणार होते. गरिबीचा फायदा घेऊन नवजात बालकांची विक्री करणाऱ्या या टोळीत आणखी किती जणांचा समावेश आहे, याचा तपास भंडारा पोलीस करत असून या घटनेने संपूर्ण विदर्भात संतापाची लाट उसळली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close