मासे पकडायला गेलेल्या तरुणीवर मगरीचा हल्ला

नदी काठी राहत असलेल्या लोकांच्या मुलांना नदीत जाऊन पोहण्याचा , मासे पकडण्याचा छंद असतो. त्यामुळे ते सुट्टीत नदीत पोहायला आणि खेळायला जातात. पण कधी कधी नदीत खेळणे अथवा मासे पकडणे जीवावर बेतू शकते याची कल्पना मुलांना नसते. नदीत मासे पकडायला गेलेल्या मुलीसोबत देखील असेच घडले. तिच्यावर मगरीने अचानक हल्ला केला. आणि तिचा हात जबड्यात घेतला. नशीब बलवत्तर म्हणून तेथे उपस्थित लोकांनी तिला मगरीच्या तावडीतून सोडवले. तरी देखील मागरीने तिचा हात कुडतरलाच. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर अनेक युजर्स मी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
घडलेल्या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तिथे असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये (Mobile) शूट केला होता. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतं की, तरुणी पाण्यात उभी आहे आणि अचानक तिच्या उजव्या हातावर मगर झडप घालते. त्यानंत तरुणी वेदनेने किंचाळते. नशीब म्हणजे तिथेच उपस्थित असलेल्या लोकांच्या मदतीमुळे तिला मगरीच्या तावडीतून सोडवण्यात यश येते. काही सेकंदांचा हा व्हिडिओ अक्षरशः अंगावर काटा आणणारा आहे.
ही घटना नेमकी कुठली आहे ते अद्याप समजले नाही. पण हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील nexus_study या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे शिवाय फेसबूक, ट्विटर(एक्स) या माध्यमांवरही शेअर करण्यात येत आहे. या घटनेनंतर प्रत्येक नागरिकाने नदी असो तलाव आणि जलाशयाजवळ जाताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
या व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी तरुणीच्या बेजबाबदार वागणुकीवर टीका केली आहे. त्यातील एका यूजरने कमेंट केली,”खुप धक्कादायक प्रसंग होता” तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,”नशीब वाचली” तर काहींनी म्हटलं आहे,”या घटनेतून काही तरी शिका आणि पाण्यात उतरताना काळजी घ्या” अशा प्रकारच्या बऱ्याच प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही