हटके

फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये तीन तरुणी मध्ये फ्रिस्टाईल

Spread the love

एकमेकींच्या झिंगट्या उपटल्या : चपलेने मारहाण

              पूर्वी सार्वजनिक नळ अथवा झोपडपट्टी क्षेत्रात महिलां मध्ये मारामारी च्या घटना पाहायला मिळत होत्या. पण आता हा प्रकार लोकल , मेट्रो किंवा अन्य ठिकानी पाहायला मिळत आहे.इथपर्यंत तर ठीक होते पण फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये देखील आता असले प्रकार घडत असल्याने महिलांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा दिल्याचे हे चिन्ह आहेत काय ? असे मिश्किल पणे बोलल्या जात आहे. 

 .

सध्या  एक व्हिडीओ  सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात चक्क एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये काही तरुणी एकमेकांशी जोरदार भांडत, मारामारी करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये तीन तरुणी आपापसात कशावरून तरी एकमेकींशी भांडत आहेत, ज्यात त्या एकमेकींचे केस पडकून कधी चप्पल तर कधी लाथां- बुक्क्यांनी एकमेकांना अक्षरश: लुडवत आहेत.

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, हे प्रकरण अमेरिकेतील लास वेगासमधील एका लक्झरी हॉटेलमधील आहे. जिथे गेल्या रविवारी एका पार्टीदरम्यान काही तरुणी कोणत्या तरी गोष्टीवरून एकमेकांशी भिडल्याचे दिसत आहे. ज्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यात कोणी एकमेकींचे केस ओढत आहे, तर कोणी चपलेने आणि लाथा बुक्क्यांनी एकमेकांनी मारहाण करत आहेत. पण ही मारामारी कोणत्या कारणामुळे झाली ही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन तरुणी एकमेकींशी भांडत आहेत. यात त्या अतिशय हिंसक पद्धतीने मारामारी करताना दिसतात. यात एक तरुणी हातात चपला घेऊन दुसऱ्या तरुणीचे केस ओढून तिला मारताना दिसत आहे. तर मार खाणारी तरुणी दुसऱ्या एका तरुणीचा शर्ट ओढून तिला लाथा- बुक्क्यांनी तुडवत आहे. तरुणींच्या या मारामारीमुळे हॉटेलमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी अनेक लोक तरुणींच्या मारामारीचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे, तर काही लोक त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत.

एक माणूस आणि सुरक्षा रक्षकाने मिळून अखेर तरुणींचे हे भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही या महिलांना ओढत पटकन एकमेकींपासून दूर नेले यामुळे महिलांची ही हिंसक मारामारी काही मिनिटांत थांबली.

(सुरक्षा रक्षकांनी या प्रकारे केले महिलांना वेगळे)

मात्र तरुणींची ही हाणामारी इतकी वाईट होती की, पोलिसांना हस्तक्षेप करत तिघींना हातकड्या घालाव्या लागल्या. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक कमेंट्सद्वारे आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी यावर हसण्याच्या रिअॅक्शन दिल्या आहेत. तर काहींना तरुणींचे हे वागणं अतिशय संतापजनक असल्याचे म्हटले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close